Tea Production : चहापत्तीचे दर वाढणार ; चहा उत्पादनात यंदा ५० टक्क्यांनी घट

Team Agrowon

देशातील चहाचे उत्पादन यावर्षी ५० टक्क्यांनी घटले आहेत. त्यामुळे चहाप्रेमींना चहाच्या घोटासाठी खिसा थोडा अधिक हलका करावा लागणार आहे. चहा पत्तीच्या दरात यंदा वाढ होण्याची शक्यता व्यावसायिक सूत्रांनी वर्तविली आहे.

Tea Production | Agrowon

आसाम आणि सिलीगुडीमध्ये यंदा पाऊस (Rain) कमी झाला आहे. त्यामुळे या परिसरात चहाचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होण्याचे संकेत टी असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेले आहेत.

Tea Production | Agrowon

टी बोर्डाने जाहीर केल्यानुसार मागील वर्षीपेक्षा २०२४ मध्ये पावसाअभावी उत्पादनाला फटका बसला आहे.

Tea Production | Agrowon

चहा प्रतिकिलो ५० ते १०० रुपयांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामानात झालेल्या बदलाचाही चहाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. असेच वातावरण राहिल्यास चहाच्या उत्पादनावर अधिक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tea Production | Agrowon

एप्रिल महिन्यात चहा बागांसाठी हवा असलेल्या पावसापेक्षा १०० मिलिमीटर पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता वाढल्याने उत्पादनावर परिणाम झालेला आहे.

Tea Production | Agrowon

चहाचे कारखाने बंद करण्याची वेळ संचालकांवर आलेली आहे. परिणामी, अनेकांचा रोजगारही जाणार आहे, असे इंडियन टी असोसिएशनचे माजी अध्यक्ष जिवनचंद पांडेय यांनी सांगितले.

Tea Production | Agrowon

आसाम आणि सिलीगुडीमध्ये पावसाने दडी मारल्याने चहाचे उत्पादन निम्म्यावर आलेले आहे.

Tea Production | Agrowon

चहाच्या दरात ५० ते १०० रुपये प्रति किलो वाढ होण्याची शक्यता आहे. चहाचा उद्योग यंदा अडचणीत सापडलेला आहे.

Tea Production | Agrowon

Tax Free Countries : जगातील 'टॅक्स फ्री' देशांबद्दल माहितेय का?