Nagpur News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गंत (पीडीकेव्ही) असलेल्या अखिल भरतीय समन्वयीत जवस संशोधन केंद्राच्या माध्यमातून जवस लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याकरिता धानपट्ट्यासह पश्चिम विदर्भात डेमो प्लॉट देत या पिकाविषयी जागृतीवर भर देण्यात आला असल्याची माहिती प्रकल्पाचे समन्वयक स्वप्नील ठाकरे यांनी दिली.
पूर्व विदर्भातील पाच जिल्हे हे धान उत्पादक म्हणून ओळखले जातात. यातील चार जिल्ह्यात एकच पीक पद्धती घेतली जाते. त्यामुळे आर्थिक सक्षमता या पट्ट्यात निर्माण होऊ शकली नाही. हीच बाब हेरत नागपूर कृषी महाविद्यालयांतर्गत असलेल्या जवस संशोधन केंद्राच्या माध्यमातून या भागात जवस लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.
२८० डेमो प्रात्यक्षिक प्रत्येकी एक एकरावर त्याकरिता घेण्यात आले. पश्चिम विदर्भातील अमरावती १४, अकोला १२, वर्धा १०, नागपूर २० याप्रमाणे प्रात्यक्षिकावर भर देण्यात आला आहे. बियाणे, बीजप्रक्रिया निविष्ठा असे साहित्य प्रकल्पातून दिले जाते. आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत निधीची उपलब्धता झाल्यास थेट खात्यात निधी हस्तांतरीत करण्यावरही यामध्ये भर देण्यात आला आहे.
किटाडी, डोमा, चंद्रपूर, शंकरपूर, सिंदेवाही या भागांत हा प्रात्यक्षिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. याला शेतकऱ्यांचा देखील आता प्रतिसाद मिळत असून, गेल्या हंगामात शिवणी गाव परिसरात एक एकरावर हा प्रयोग होता आता २५ एकरांवर जवस लागवड पोहोचली आहे, असे स्वप्नील ठाकरे यांनी सांगितले. ११० ते ११५ दिवसांच पीक असून सिंदेवाही तालुक्यात तर शून्य मशागत तंत्रज्ञानावर जवस लागवडीचा प्रयोग केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.