Team Agrowon
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यत्र्यांनी शिवारात जाऊन तेथील लोकांनासोबत बांबूची लागवड केली.
देशातील बांबूचे उत्पादन वाढावे यासाठी केंद्र सरकार देखील अनुदान देत आहे. त्यामुळे सध्या बांबूचं शेती करण्याचं प्रमाण वाढत आहे.
केंद्र सरकार बांबूची शेती करणाऱ्यांना एका झाडामागे १२० रुपयाचं अनुदान देत आहे. ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे
बांबू शेती करण्याचा अनेक फायदे आहेत. या झाडाला वारंवार लक्ष द्याव लागत नाही. लागवड केल्यानंतर ४ वर्षाने बांबूची कापणी केली जाते.
बांबू लागवड करताना बांबूच्या दोन झाडांमधील अंतर पाच फूट ठेवावे लागतं. अथवा वाढ होण्यास अडचण होते.
लागवडीच्या तीन वर्षांमध्ये प्रति झाड 240 रुपये खर्च येतो. बांबूची शेती हंगामानुसार केली जात नाही.
बांबूची लागवड करताना तुमची काही जमीन पडीक असेल किंवा एखाद्या जमिनीत पाण्याचा प्रश्न असेल तिथे करु शकता.
भारतात दरवर्षी सात दशलक्ष कोटी रुपये किमतीच्या बांबूची आयात होते.