Electricity Supply Update : खंडित वीजपुरवठ्यामुळे खानदेशात पिके संकटात

Jalgaon Electricity Shortage : खानदेशात मागील आठवड्यातील वादळी पावसानंतर अनेक गावांत, शिवारात वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.
Power Supply
Power SupplyAgrowon
Published on: 
Updated on: 

Jalgaon News : खानदेशात मागील आठवड्यातील वादळी पावसानंतर अनेक गावांत, शिवारात वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. गावांत १० ते १५ तास वीज बंद असते. शिवारातही वीज फक्त काही तास येते. यामुळे कापूस, केळी पिके संकटात आहेत.

जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथील शिवार व गावात शनिवारी (ता. १०) व रविवारी (ता. ११) वीज काही तासांचा अपवाद वगळता बंद होती. पशुधनाला पिण्याच्या पाण्यासाठी वीज द्या, अशी विनवणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

फुपनगरी शिवारातही सलग तीन दिवस वीज बंदच होती. चोपडा तालुक्यात माचले, कुरवेल, सनपुले भागातही शिवार आणि गावात वीज सुरळीत नाही. नुकतेच कुरवेल येथील वीज उपकेंद्रात मध्यरात्रीपासून ते सकाळपर्यंत शेतकऱ्यांनी विजेसाठी आंदोलन केले. किरण गुर्जर यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

या वेळी वीज कंपनीचे अधिकारीच सुट्टी टाकून रजेवर गेल्याचे दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांचा अधिकचा संताप झाला. यावल, रावेरात मागील आठवड्यात वादळ व पावसाने मोठी हानी झाली. विजेचे खांब कोसळले. त्यांची दुरुस्ती झालेली नाही. यामुळे कापूस व केळी पीक वाया जाण्याची स्थिती आहे.

Power Supply
Electricity Supply : मराठवाड्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण ६५ टक्‍क्‍यांनी घटले

नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा (ता. शहादा) येथील वितरण कंपनीच्या कार्यालयावर टेंभा, देऊर, कमखेडा येथील शेतकऱ्यांनी मोर्चा काढत निवेदन दिले. परिसरात फक्त पाच दिवसच वीजपुरवठा मिळतो, त्यातही दिवसातून आठ ते दहा वेळेस वीजपुरवठा खंडित होतो, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली.

तापी पट्ट्यात केळी, पपई, मिरची, कापूस या प्रमुख पिकांची शेतकरी लागवड करतात. खंडित वीजपुरवठ्यामुळे पिकांना सध्या पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्‍वभूमीवर शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर येऊन त्यांनी निवेदन सादर केले या निवेदनानंतर वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

कळंबू उपकेंद्राचे काम सुरू करावे

कळंबू येथे नवीन सबस्टेशन तीन वर्षांपासून मंजूर असतानादेखील त्याचे काम अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.

कळंबू येथे सबस्टेशन सुरू झाल्यावर सारंगखेडा सबस्टेशनवरील भार कमी होऊन सर्व शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळणार असल्याने मंजूर झालेले सबस्टेशनच्या कामाला त्वरित सुरूवात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Power Supply
Monsoon Update : मॉन्सूनपूर्व कामांसाठी वीजपुरवठा बंद
विजेची मागणी वाढली असून, आठ तास केवळ पाच दिवस वीजपुरवठा केला जात आहे. कळंबू येथील मंजूर असलेले उपकेंद्रदेखील तत्काळ तयार करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडाव्यात. परिसरातील वायरमन रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी यावेत. उन्हाच्या तडाख्यात कोवळी पपई, केळी कापसाची पिके धोक्यात आली आहेत.
प्रशांत चव्हाण, शेतकरी देऊर (जि. नंदुरबार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.