Electricity Supply : मराठवाड्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण ६५ टक्‍क्‍यांनी घटले

Marathawada Electricity Supply : मराठवाड्यात २०२१-२०२२ या वर्षात विविध कारणांनी १ लाख ८० हजार ९५८ वेळा ११ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
Electricity Supply
Electricity SupplyAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात २०२१-२०२२ या वर्षात विविध कारणांनी १ लाख ८० हजार ९५८ वेळा ११ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

तथापि, ‘महावितरण’ने काटेकोर नियोजन केल्याने २०२२-२३ या वर्षात केवळ ६३ हजार ६४ वेळा वीजपुरवठा खंडित झाला. हे प्रमाण ६५ टक्‍क्‍यांनी घटविण्यात यश आले आहे, असा दावा ‘महावितरण’ने केला आहे.

‘महावितरण’च्या माहितीनुसार, २०२१-२०२२ या वर्षात खंडित वीजपुरवठ्याचा एकूण कालावधी ५ कोटी ६२ लाख ४९ हजार ४४९ मिनिटे होता. तो २०२२-२३ या वर्षात ८२ टक्‍क्‍यांनी कमी करण्यात म्हणजे ९७ लाख ६१ हजार ३१६ मिनिटांवर आणण्यात महावितरण यशस्वी ठरले आहे.

डॉ. गोंदावले यांनी ‘महावितरण’च्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर मराठवाड्यातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यास प्राधान्य दिले आहे.

Electricity Supply
Electricity Supply : पैसे भरूनही वीज जोडणीचे ५,९०८ प्रस्ताव प्रलंबित

सूक्ष्म नियोजनासह यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी सातत्याने अभियंते व जनमित्रांशी बैठका व व्हीसीद्वारे संवाद साधला. वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठीची नियोजित देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेवर व दर्जेदार करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच वाहिन्यांची नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी कंत्राटदारांना सूचना देऊन त्यांच्या कामाचा नियमित आढावा घेतला.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो कमीत कमी वेळात पूर्ववत करा, पूर्वनियोजित कामांसाठी वीज बंद ठेवण्याबाबत ग्राहकांना माहिती द्या, ग्राहकांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करा, देखभाल व दुरुस्तीची कामे करणाऱ्या कंत्राटदाराचा दर्जा तपासा, अशा सूचना डॉ. गोंदावले यांनी अभियंत्यांना दिल्या. या बाबींची अंमलबजावणी केल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण घटले.

सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन

मोबाइल ॲप, बेवसाइट, कॉल सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांना तत्पर व पेपरलेस सेवा देण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्न करत आहे.

वीजबिल ऑनलाइन भरल्यास ०.२५ टक्के सवलत, गो-ग्रीन संकल्पनेअंतर्गत छापील बिलांऐवजी केवळ ई-बिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रतिबिल १० रुपये सवलत, अशा सुविधा उपलब्ध आहेत. या सेवांचा लाभ घेऊन ग्राहकांनी थकबाकीसह आपले वीजबिल नियमित भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com