Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

Monsoon Update : मॉन्सूनपूर्व कामांसाठी वीजपुरवठा बंद

पावसाळ्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा त्रास नागरिकांना कमी व्हावा, या दृष्टीने वीज वितरण विभागाने शहरातील मॉन्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे.

महाड : पावसाळ्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा (Electricity Supply Problem) त्रास नागरिकांना कमी व्हावा, या दृष्टीने वीज वितरण विभागाने शहरातील मॉन्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे.

त्यानुसार २४ एप्रिलपासून २७ एप्रिलपर्यंत महाड शहरातील पाच भागांमध्ये सकाळी ८ ते १०.३० या वेळात वीजपुरवठा (Electricity Supply) बंद राहणार आहे, अशी माहिती महावितरणच्या महाड कार्यालयाने दिली आहे. सकाळच्या वेळेत ही कामे केली जाणार असल्याने नागरिक व कामगारांना ऐन उन्हाळ्यात जाणवणारा त्रास कमी होणार आहे.

दरवर्षी प्रमाणे मॉन्सूनपूर्व कामांची आखणी, नियोजन व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य वीजवितरण विभागामार्फत महाड शहरातील पाच भागांमध्ये या कामांचे नियोजन केलेले आहे.

Monsoon Update
Monsoon Update : यंदा एल निनो अन् मॉन्सून कसा असणार?

सोमवारी (ता. २४) आणि बुधवारी (ता. २६) सकाळी ८ ते १०.३० या वेळेमध्ये चांभारखिंड, काकरतळे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चवदार तळे, रायगड रोड, दस्तुरी नाका, दोन्ही मोहल्ले, भीमनगर, सुंदरवाडी, बुटाला हॉल परिसर, उभा मारुती, एसटी स्टँड परिसर, बाजारपेठ, तांबट आळी या भागातील वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

तर मंगळवार (ता. २५) आणि गुरुवार (ता. २७) या दिवशी शेडाव नाका, नवे नगर, पंचशील नगर, रोहिदास नगर, प्रभात कॉलनी, विरेश्वर देवस्थान परिसर, कुंभारआळी, गवळआळी, वेताळवाडी, तांबड भवन, अर्जुन भोई मार्ग, आयटीआय कॉलेज परिसर या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com