
Khed News: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील चास, कमान व परिसरात बुधवारी (ता. ७) सायंकाळी वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. झाडे पडली, आब्यांची गळ झाली, पिके भुईसपाट झाली, वीटभट्टी चालकांची धांदल उडाली. यामध्ये झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
चास, कमान व परिसरात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली. वाऱ्याच्या वेगाबरोबरच पावसाने दमदारपणे बरसण्यास सुरुवात केली. वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता की काही शेतकऱ्यांची शेतात रचून ठेवलेली वैरण उडून गेली.
कांताराम ढमढेरे यांचे उन्हाळी हंगामातील बाजरीचे पीक भुईसपाट झाले. तर सुभाष रासकर, गणपत मुळूक यांचे मक्याचे पीक भुईसपाट झाले. कमान, मोहकल परिसरात असणाऱ्या वीटभट्टी चालकांची तारांबळ उडाली. कच्च्या विटा व नवीन लावलेली वीटभट्टी पावसाने भिजू नये म्हणून ताडपत्रीच्या साह्याने झाकण्यासाठी भर पावसात पळापळ करावी लागली. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे केली आहे.
कुसुर परिसरात पाऊस
आपटाळे : जुन्नरच्या पश्चिम भागातील कुसुर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान व अवकाळी पावसाचे वातावरण आहे. यामुळे बाजरी उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. सध्या तालुक्याच्या पश्चिम भागात उन्हाळी बाजरीचे पीक काढणीच्या अवस्थेत आहे. ढगाळ हवामानामुळे बाजरीचे पीक काढण्याची धावपळ सुरू आहे.
चास येथे आंबा पिकाला फटका
महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यातील चास येथे बुधवारी (ता. ७) सायंकाळी वादळी वारे आणि तुरळक पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून दोन ठिकाणी महावितरण कंपनीचे विजेचे खांब कोसळले आहेत. तर आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत प्रवाह सुरू असताना वादळी वाऱ्यामुळे वीज वाहक तारा आणि खांब तुटले. शेगरमळा, गणेशवाडी, संत ज्ञानेश्वर विद्यालय परिसरात वादळी वाऱ्यामुळे आंबा, सुबाभूळ, कडूनिंब आदी झाडे पडली आहेत. काढणीला आलेले आंबे जमिनीवर पडले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.