Crop Damage : बुलडाणा, अकोल्यात पूर्वमोसमी पावसाचा धुमाकूळ सुरूच

Pre Monsoon Rain : जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सातत्याने येत असून तेल्हारा तालुक्यात मे महिन्यात तिसऱ्यांदा नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान केले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Akola News : जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सातत्याने येत असून तेल्हारा तालुक्यात मे महिन्यात तिसऱ्यांदा नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान केले. अकोट, शेगाव, संग्रामपूर या तालुक्यांतही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले. रस्त्याच्या कडेची झाडे, विद्युत खांबही कोलमडले.

शनिवारी (ता.१८) या भागातील काही तालुक्यांत पाऊस झाला. अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्यांचा यात समावेश आहे. नैसर्गिक आपत्तींच्या अग्रस्थानी मे महिन्यात तेल्हारा तालुका सापडला आहे. आठवडाभरात तीन वेळा वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्याने अनेक घरांची पडझड झाली.

Crop Damage
Crop Damage : श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांना वादळी पावसाचा तडाखा

घरांवरील टीनपत्रे उडाली. विद्युत तारा तुटल्या. तालुक्यातील वरुड बिहाडे, राणेगाव भोकर व आजूबाजूच्या परिसरात साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाची गारपीट झाली.

या परिसरात ज्वारीचे पीक सोंगणी करून शेतात ठेवलेले आहे. उभे असलेले पीक वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच तालुक्यात गेल्या आठवड्यात पावसामुळे केळी, पपई, ज्वारी, बाजरी, मका पिकांचे नुकसान झाले होते.

अकोट तालुक्यातही पूर्वमोसमी पाऊस झाला. वादळामुळे रूईखेड परिसरात पणज, बोचरा, महागाव, मार्डी येथे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अर्धातास वादळ, पावसाने धुमाकूळ घातला. केळी, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले.

बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, शेगाव, खामगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. वादळी वारा, विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे नागरिकांची पळापळ झाली. वादळामुळे संग्रामपूर, शेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर काही गावातील घरांवरील टिनपत्रे उडाली असून पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : पावसामुळे दोन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

१० ते १२ ठिकाणी विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. अनेक भागात शनिवारी रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा बंद होता. संग्रामपूर तालुक्यात पातुर्डा, वानखेड, आवार, टाकळी पंच, पातुर्डा फाटा, खिरोडा या परिसरात पाऊस झाला. पातुर्डा गाव ते पातुर्डा फाटा या ३ किलोमीटर अंतरात रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे, विजेचे खांब तुटून पडले.

पातुर्डा येथील शेतकरी नीलेश चांडक यांनी आपल्या शेतात ५ एकरात ज्वारी पेरली होती. ती ज्वारी खुडण्यासाठी तयार झाली होती. त्यापैकी ३ एकर मधील ज्वारी खुडून गंजी मारलेली होती. तर २ एकर उभी होती. आज अचानकपणे आलेल्या तुफान वाऱ्यामुळे ज्वारीचे नुकसान झाले आहे. खामगाव शहर व परिसरातही सायंकाळच्या सुमारात पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com