Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाचा ३८ हजार हेक्टरला फटका

Rain Crop Loss : पावसाळा संपल्याने व सिंचन सुविधा झाल्याने आता रब्बी हंगामाच्या कामांना गती आली होती. त्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) झालेल्या अतिवृष्टीसदृश मॉन्सूनोत्तर पावसाचा पुन्हा जिल्ह्यातील ३८ हजार ५५४ हेक्टरला फटका बसला आहे. उभी पिके जमीनदोस्त झाली झाल्याने शेतकऱ्यांची स्वप्ने बेचिराख झाली आहेत.

चांदवड, देवळा, बागलाण, पेठ व इगतपुरी येथे सर्वाधिक फटका बसला. यात मका, सोयाबीन, भात, कांदा, द्राक्षे व डाळिंब पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.

पावसाळा संपल्याने व सिंचन सुविधा झाल्याने आता रब्बी हंगामाच्या कामांना गती आली होती. त्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने पिके जमीनदोस्त झाली आहेत. नद्या, नाले दुथडी भरून वाहिल्याने पिकांची दैना झाली आहे. शेतातच पाणी साचल्यामुळे पिके शिवारातच सडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

Crop Damage
Crop Damage : जोरदार पावसाने भात, मका पिकांचे नुकसान

शनिवारी जिल्ह्याच्या ८०६ गावांमधील ७६ हजार ५५८ शेतकऱ्यांना फटका बसला. जिरायत क्षेत्रातील २३ हजार ९१७ हेक्टरवरील मका, सोयाबीन, भाजीपाल्याचे नुकसान झाले. तसेच बागायत क्षेत्रावर लागवड केलेला कांदा व कांद्याच्या रोपांच्या १३ हजार ६०३ हेक्टरला तडाखा बसला आहे.

११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसामुळे उभी पिके एकतर जागेवर आडवी झाली होती. त्यातच पुन्हा झालेल्या पावसाच्या पाण्यासमवेत नदी, नाल्यांमध्ये वाहून गेली. मक्याची कणसे वाहून गेली. सोयाबीन मोठ्या प्रमाणावर खराब झाले. तर कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांचे नुकसान आहे.

Crop Damage
Paddy Crop Damage : काढणीस आलेल्या भात पिकांचे पावसाने नुकसान

पीकविम्यात अडचणी

पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र शेतकरी पीकविमा कंपनीकडे संपर्क करत असताना अनेक ठिकाणी संपर्क होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिवाय संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नाही. काही वेळेत संपर्क झाला तर क्षेत्रीय यंत्रणा अजूनही बांधावर आली नाही, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे पंचनामे कशाला सरसकट नुकसान भरपाई जाहीर करा, असा सूर शेतकऱ्यांचा आहे.

पीकनिहाय नुकसान

मका ११,५८४

सोयाबीन ३२६

भात ९,०४८

भाजीपाला २,९५८

कांदा १२,९६१

कांदा रोप ६४२

द्राक्षे ६२४.५५

डाळिंब ४०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com