Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage : जोरदार पावसाने भात, मका पिकांचे नुकसान

Paddy Damage : खरीप हंगामाच्या पिकांची काढणी होत असते. इगतपुरी तालुक्यातील सर्वच भागांत भात,सोयाबीन,नागली,वरई आदी पिके काढणीसाठी तयार झाली आहेत.
Published on

Nashik News : इगतपुरी तालुक्यात शनिवारी (ता. १९) झालेल्या पावसाने पश्चिम भागातील आवळखेड, चिंचलेखैरे, त्रिंगलवाडी, तळेगाव, भावली, पिंपरीसदो, नांदगाव सदो, पारदेवी, टाकेद मंडळातील खेडभैरव, टाकेद, वासाळी, आंबेवाडी, सोनोशी व बारशिंगवे परिसरात सोंगणीला आलेल्या भातांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात खरीप हंगाम अजूनही सुरु आहे. खरीप हंगामाच्या पिकांची काढणी होत असते. इगतपुरी तालुक्यातील सर्वच भागांत भात,सोयाबीन,नागली,वरई आदी पिके काढणीसाठी तयार झाली आहेत.

Crop Damage
Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे अतोनात नुकसान

भात पिकांतील निमगरी,हाळी जातीच्या सर्वच वाणे काढणीसाठी आली असून पावसाच्या व्यत्ययाने चिंता वाढली आहे. दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने लोंबीने भरलेले भात पीक आडवे होत आहे. काही भागात भाताची खाचरे भरले असून भात पीक आडवे झाल्याने धान कुजणार आहेच.

Crop Damage
Nashik Crop Damage : नाशिक जिल्ह्याला पुन्हा पावसाने झोडपले

Cजनावरांसाठीचा पेंढा देखील सडणार आहे. मालेगाव कॅम्प : मागील आठवड्यात अस्ताणे येथे झालेल्या जोरदार पावसामुळे मनकारी शिवारात पोल्ट्री फॉर्ममध्ये पाणी शिरल्याने सुमारे ७०० कोंबडीच्या पिल्लांचा मृत्यू झाला. या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी पोल्ट्री चालकाने केली आहे.

अस्ताणे येथील मनकारी शिवारातील शेतात संदीप ठोके यांचा पोल्ट्री व्यवसाय आहे. याठिकाणी त्यांनी ७०० पिल्ले होती. रविवारी (ता. १३) रात्री अकराला सुमारे दोन ते तीन तास चाललेल्या मुसळधार पावसाने पाणीच पाणी झाले. हे पाणी थेट पोल्ट्रीत शिरल्याने पिल्ले पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पावसामुळे गुरांचा चाराही पाण्यात वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com