
Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यात मंगळवारपर्यंत (ता. २०) झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे सुमारे ४ हजार २१८ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याआधी मेमध्येच सुमारे अडीच हजार हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाकडून देण्यात आला होता.
महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार, पावसामुळे ५९७ गावांतील ७,१४६ शेतकऱ्यांच्या सुमारे २,४१८.५४ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले. यामध्ये जिरायत २५१.०८ हेक्टर, बागाईत १,८८४.७२ हेक्टर तर फळ पिकांचे सुमारे २,०८२.७४ क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
२७ जणांचा मृत्यू २१ जखमी
नैसर्गिक आपत्तीत मंगळवारपर्यंत (ता. २०) आठही जिल्ह्यांतील सुमारे २७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर सात जिल्ह्यांतील २१ जण जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये जालना जिल्ह्यातील सर्वाधिक ७, त्या पाठोपाठ नांदेड व बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी ५, छत्रपती संभाजीनगरमधील ३,
हिंगोली, लातूर व धाराशिवमधील प्रत्येकी २ तर परभणीमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये जालना जिल्ह्यातील सर्वाधिक ७, छत्रपती संभाजीनगरमधील ४, धाराशिव व हिंगोलीतील प्रत्येकी ३, बीडमधील २ व नांदेड, परभणीतील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
घर आणि गोठ्यांचेही नुकसान
चार कच्च्या घरांचे पूर्णतः नुकसान झाले. तर २२ पक्क्या घरांची अंशतः पडझड झाली. याशिवाय ८४ कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली तर आठ गोठ्यांचेही नुकसान झाल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
३९१ जनावरे दगावली
नैसर्गिक आपत्तीत सुमारे ३५१ दुधाळ व ओढकाम करणारी जनावरे दगावली. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ५९, जालन्यातील ८७, परभणीतील २१, हिंगोलीतील ३०, नांदेडमधील ३९, बीडमधील ४५, लातूरमधील ८२ व धाराशिवमधील २८ जनावरांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.