Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Village Prosperous : बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये आता समूह शेती, एकात्मिक शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसाह्यता गट, ग्रामस्तरीय प्रक्रिया उद्योग, कौशल्य आधारित आधुनिक शेती तंत्र आदी शब्दप्रयोग ग्रामस्तरावर प्रचलित होत असून ते काळाची गरज आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Akola News : बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये आता समूह शेती, एकात्मिक शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसाह्यता गट, ग्रामस्तरीय प्रक्रिया उद्योग, कौशल्य आधारित आधुनिक शेती तंत्र आदी शब्दप्रयोग ग्रामस्तरावर प्रचलित होत असून ते काळाची गरज आहे. एकात्मिक प्रयत्नातून आर्थिक संपन्न आदर्श गावाची निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

विद्यापीठ आदर्श गांव योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या दत्तक ग्राम मुरादपूर येथे कृषी विज्ञान केंद्राद्वारा आयोजित प्रक्षेत्रफेरी तसेच चर्चासत्र प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. वैदर्भीय शेती शाश्‍वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी विविध उपक्रमांचे विद्यापीठातर्फे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन देखील डॉ. गडाख यांनी केले.

Agriculture
Agriculture Development : प्रकल्प, योजनांद्वारे कृषीक्षेत्र विकासाला चालना

शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अनिल तारू, कृषी विभागाच्या सहायक सवडतकर यांची उपस्थिती होती. या वेळी कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणाअंतर्गत ‘शेतकरी शास्त्रज्ञ मंच’चे जिल्ह्यातील प्रगतिशील सदस्य शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मुरादपूर गावात विद्यापीठ आदर्श ग्राम योजनेअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उपक्रमांची पाहणी व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शनासाठी मान्यवरांनी गावातील विविध ठिकाणी प्रक्षेत्रावर भेटी देऊन पाहणी केली.

Agriculture
Agriculture Development : शेती विकासासाठी डिजिटल युगाची पायाभरणी

कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून मुरादपूर येथे सहा शेतकऱ्यांच्या शेतावर तुती लागवड करण्यात येत आहे. त्यामधील संजय श्रीराम गाडेकर यांच्या शेतावरील सुधारित पद्धतीने तुती लागवड आणि पुढील रेशीम प्रकल्प उभा करण्याच्यासंदर्भात कामाची पाहणी केली. उमेश गाडेकर यांच्या शेतावर साकारण्यात येत असलेल्या एकात्मिक शेती पद्धतीमधील शेळीपालन, गोपालन, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, चारा पीक, फळबाग व भाजीपाला लागवड तसेच हंगामी पिकातील सुधारित वाणांची लागवड उपक्रमास सर्व ग्रामस्थ यांच्या सोबत भेटी दिल्या आणि मार्गदर्शन केले. मुरादपूर येथील प्रगतिशील शेतकरी संतोष गाडेकर यांची शेतीवर डेअरी युनिट, अझोला प्रात्यक्षिक युनिट, डीएचएम १०-चारा पीक, गांडूळ खत युनिटची सर्व ग्रामस्थांसोबत तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचच्या सदस्यांसोबत पाहणी केली व मार्गदर्शन केले.

या वेळी डॉ. उंदीरवाडे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबत शेतकऱ्यांची मते जाणून घेत विद्यापीठ आदर्श ग्राम या संकल्पनेबाबत चर्चा केली. मुरादपूर येथील सरपंच अनंता गाडेकर, पोलिस पाटील नरसिंग गाडेकर, प्रगतशील शेतकरी भारत परिहार, विजय गाडेकर, सिद्धेश्‍वर गाडेकर, देविदास भगत, प्रेम जाधव, संतोष गाडेकर यांचीही उपस्थिती होती. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तारू यांच्यासह विषयतज्ज्ञ डॉ. नरेंद्र देशमुख, डॉ. जगदीश वाडकर, डॉ. भारती तिजारे, डॉ. देशपांडे व इतर या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com