Agriculture Development : प्रकल्प, योजनांद्वारे कृषीक्षेत्र विकासाला चालना

Horticulture : राज्यात फलोत्पादन क्षेत्र व उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी विविध प्रकल्प व योजना राबविण्यात येत आहेत.
Agriculture Development
Agriculture DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्यात फलोत्पादन क्षेत्र व उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी विविध प्रकल्प व योजना राबविण्यात येत आहेत. या विविध प्रकल्प व योजनांच्या माध्यमातून फलोत्पादन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून कृषी व्यवसायाला चालना देणार असल्याचे प्रतिपादन फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

मालेगाव येथील बालाजी लॉन्स येथे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत कृषी विभाग व आत्मा, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय डाळिंब व कांदा पीक परिसंवादाचे उद्‌घाटन पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Agriculture Development
Agricultural Development : ‘एफपीओं’च्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून प्रगती शक्य

या वेळी नाशिक विभागीय कृषी सहसंचालक रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव आमले, आत्माचे प्रकल्प संचालक सुनील वानखेडे, काष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे प्राचार्य सचिन नांदगुडे, बाबासाहेब गोरे, मालेगाव ॲग्रो डीलर्स असोसिएशन्सचे अध्यक्ष अनिल निकम, उप विभागीय कृषी अधिकारी गोकुळ आहिरे, तहसीलदार विशाल सोनवणे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, की डाळिंब व कांदा यांसारख्या पिकांमुळे शेतकऱ्यांची प्रगती होत असली तरी डाळिंबावरील तेलकट डाग, करपा, फूलगळ सारख्या विविध रोगांमुळे हे पीक अडचणीत येते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Agriculture Development
Agriculture Development : शेती विकासासाठी डिजिटल युगाची पायाभरणी

वैयक्तिक शेतकरी बांधवांना दोन ड्रोन मिळाले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत शास्त्रीय पद्धतीने पिकांवर फवारणी केल्यामुळे वेळ वाचणार असून आर्थिक बचतही होणार आहे. कृषी विभागामार्फत फलोत्पादन वाढीसाठी विविध योजना राबविण्यात येतात.

यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, कांदाचाळ आदी योजना आहेत. तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती मिळालेल्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन भुसे यांनी या वेळी केले. उप‍ विभागीय कृषी अधिकारी श्री. आहिरे यांनी प्रास्ताविक केले. तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com