शरद अवचटModern Fruit Orchard Management Techniques: सीआरए हे कमी खर्चिक, सोपे आणि शाश्वत तंत्रज्ञान असून ते विशेषतः कमी पर्जन्यमान असलेल्या भागांतील फळबागेसाठी उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानामध्ये पाणी आणि अन्नद्रव्ये थेट झाडांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात पोहोचविली जातात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन फळबाग दुष्काळाच्या स्थितीतही टिकवून ठेवणे शक्य होते. .सीआरए तंत्रज्ञान म्हणजे काय?पारंपरिक सिंचनामध्ये पाणी जमिनीच्या वरच्या थरात दिले जाते. उन्हाळ्यात या पाण्याचे बाष्पीभवन होते. वरच्या थरातील पाण्यामुळे झाडांची मुळे वरच्या भागात विकसित होतात. परिणामी पाण्याच्या कमतरतेमध्ये झाडांवर ताण येतो..सीआरए (CRA- Climate Resilient Agriculture – Water Root Zone Irrigation) तंत्रज्ञानामध्ये पाणी थेट २ ते ३ फूट खोल मुळांच्या कार्यक्षेत्रात पोचविले जाते. त्यामुळे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक ओलावा दीर्घकाळ उपलब्ध राहून मुळे खोलवर विकसित होतात. हे तंत्रज्ञान तामिळनाडूतील आयएएस केडरचे अधिकारी डॉ. कोर्लापती सत्यगोपाल यांनी विकसित केले आहे..तंत्रज्ञानाची उद्दिष्टेपाण्याची बचत करणेखतांचा कार्यक्षम वापर करणे.हवामान बदलाचा परिणाम कमी करणे.मुळांच्या खोलवर वाढीस प्रोत्साहित देणे.पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविणे..Soil Testing Technology: सेन्सर-आधारित मृदा आरोग्य परीक्षण.तंत्रज्ञानाची तांत्रिक रचनाखड्ड्याची तयारीफळझाडांच्या लागवडीसाठी २ बाय २ बाय २ फूट किंवा ३ बाय ३ बाय ३ फूट आकारमानाचा खड्डा खणावा. खड्ड्याच्या तळाला मध्यभागी किंवा चारही कोपऱ्यांमध्ये पहारी अथवा स्क्रू ऑगरच्या सहाय्याने सुमारे १ फूट अतिरिक्त खोलीचे छिद्र करावे. या छिद्रामुळे पाणी आणि अन्नद्रव्ये जमिनीच्या खोल थरात झिरपतात व मुळांच्या कार्यक्षेत्रात साठून राहतात..सेंद्रिय खतांचा वापरकाढलेल्या खड्ड्याच्या तळाशी गांडूळ खत, चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खते यांचा पुरेसा वापर करावा. या सेंद्रिय खतांमुळे मुळांच्या सानिध्यात उपयुक्त सूक्ष्मजिवांच्या वाढीस चालना मिळून त्यांची संख्या वाढण्यास मदत होते..पीव्हीसी पाइपची मांडणीतयार खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये ३ ते ४ इंच व्यासाचे आणि अंदाजे ३ फूट लांबीचे पीव्हीसी पाइप उभे बसवून घ्यावेत. हे पाइप कायमस्वरूपी ठेवायचे नसून वाळूचे स्तंभ तयार करण्यासाठी तात्पुरते वापरले जातात..वाळूचे स्तंभ तयार करणेपीव्हीसी पाइपमध्ये चाळलेली नदीची बारीक वाळू भरावी. फळझाडांची लागवड पूर्ण झाल्यानंतर पाइप अलगद बाहेर काढावेत. त्यामुळे त्या ठिकाणी वाळूचे कायमस्वरूपी स्तंभ तयार होतात. या वाळूच्या स्तंभांमार्फत पाणी आणि हवा मुळांच्या सानिध्यात जलद पोहोचविली जाते..पाणी देण्याची पद्धतठिबक सिंचनाचे ड्रीपर किंवा पाण्याचा पुरवठा थेट वाळूच्या स्तंभांवर करावा.जेव्हा पाणी दिले जाते तेव्हा ते, जमिनीवर साचत नाही.वरच्या थरात पसरत नाही.थेट मुळांच्या कार्यक्षेत्रात पोहोचते.बाष्पीभवन कमी होते.पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते..Citrus Orchard Management: गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय बागेचे व्यवस्थापन.सीआरए तंत्रज्ञानामागील वैज्ञानिक आधारहवा खेळत राहतेवाळूच्या स्तंभांमुळे मुळांच्या सानिध्यात हवा खेळती राहते.मुळांची श्वसनक्रिया सुधारते.सूक्ष्मजिवांची क्रियाशीलता वाढते.अन्नद्रव्यांचे शोषण अधिक प्रभावी होते.झाडांची वाढ जोमदार होते..मुळांची खोलवर वाढपाणी थेट जमिनीच्या खोल थरात दिले जाते, तेव्हा झाडांची मुळेही त्या दिशेने वाढतात. त्यामुळे मुळांचे जाळे मजबूत बनते. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. झाडे दीर्घकाळ पाण्याविना तग धरू शकतात..अधिक जैवभारझाडाच्या बुंध्याचा व्यास वाढतो.पर्णसंभार दाट होतो.फांद्यांची संख्या जास्त होते.प्रकाशसंश्लेषणाची क्षमता अधिक राहते.उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत मिळते..सीआरए पद्धतीसाठी उपयुक्त फळपिकेमोसंबी....अत्यंत उपयुक्तसंत्रा.......अत्यंत उपयुक्तडाळिंब....अत्यंत उपयुक्तआंबा......उपयुक्तसीताफळ....उपयुक्तचिकू........उपयुक्तलिंबू........अत्यंत उपयुक्तजांभूळ......उपयुक्त.घ्यावयाची काळजीखड्ड्यात वापरावयाची वाळू स्वच्छ व चाळलेली असावी.ठिबकचे ड्रिपर वाळूच्या स्तंभाजवळच ठेवावेत.खड्डा भरताना सेंद्रिय खतांचा पुरेसा वापर करावा.पाण्याचा अतिवापर टाळावा.मल्चिंगचा वापर केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात.नियमित निरीक्षण करावे.- शरद अवचट ९६६५३०११८१(उद्यानविद्या विभाग, एमजीएम, कृषी विज्ञान केंद्र, गांधेली, जि. छत्रपती संभाजीनगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.