Cow Simulator Model : ‘पशुवैद्यकीय’मध्ये गायीचे सिम्युलेटर मॉडेल

Animal Care : परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील प्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागामध्ये कृत्रिम रेतनासाठी गायीचे सिम्युलेटर मॉडेल स्थापित करण्यात आले आहे.
Cow Simulator Model
Cow Simulator ModelAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा

VNMKV, Parbhani News : परभणी ः परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील प्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागामध्ये कृत्रिम रेतनासाठी गायीचे सिम्युलेटर मॉडेल स्थापित करण्यात आले आहे. या मॉडेलच्या साहाय्याने प्रशिक्षणार्थी पशुवैद्यकांना प्रत्यक्ष जनावराशिवाय कृत्रिम रेतन तंत्रज्ञान अचूकतेने शिकता येणार आहे.

राष्ट्रीय गोकुळ मिशनअंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांच्यातर्फे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील प्रजनन, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागात मैत्री प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जात आहेत. प्रकल्पाचे समन्वयक डॉ. अभिनय सावळे यांनी माफसूचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर राजूरकर यांच्या मार्गदर्शनात कृत्रिम रेतनासाठी गायीचे सिम्युलेटर मॉडेल प्राप्त केले आहे. माफसूच्या कार्यकारी परिषद सदस्य ऋषीकेश खांदे यांनी सोमवारी (ता. ३) पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयास भेट दिली. त्या वेळी निम्न शिक्षण समन्वयक डॉ. पंडीत नांदेडकर, डॉ. सावळे यांच्या समवेत गायीच्या सिम्युलेटर मॉडेलची पाहणी केली.

Cow Simulator Model
PenTakli Model : काटेकोर पाणी नियोजनाचे ‘पेनटाकळी’ मॉडेल!

डॉ. सावळे म्हणाले, की गायीचे सिम्युलेटर मॉडेल प्रशिक्षणार्थी पशुवैद्य आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी प्रशिक्षण साधन ठरणार आहे. हा आधुनिक सिम्युलेटर गायीच्या प्रजनन प्रणालीतील माज (उष्णता) निर्माण होण्याच्या नैसर्गिक परिस्थितीचे अनुकरण करतो. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष अनुभव मिळतो. खांदे म्हणाले, की

या सुविधेमुळे पशुवैद्यकीय विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, संशोधकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृत्रिम रेतन प्रशिक्षण अधिक अचूकतेने आणि आत्मविश्वासाने घेण्यास मदत होईल.

गायीच्या सिम्युलेटर मॉडेलची प्रमुख वैशिष्ट्ये

योनी, गर्भाशयमार्ग, गर्भाशय, अंडाशय, गुदमार्ग तपासणीसाठी मॉडेलची सुविधा. प्रशिक्षणादरम्यान बाजूच्या खिडकीतून तसेच वरच्या बाजूने निरीक्षण करण्याची सोय. प्रशिक्षणार्थी आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य उंची व प्रत्यक्ष गायीच्या आकारमानाचे मॉडेल. नैसर्गिक प्रजनन परिस्थितीचे अनुकरण करण्यासाठी माज निर्माण करणारे सेन्सर्स. टिकाऊ एफआरपी साहित्यामध्ये तयार केलेले आणि सुलभतेने चालवता येणारे मॉडेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com