Kolhapur News : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील दूध संघांनी गाय दूध खरेदी दरामध्ये लिटरला ३ रुपयांची कपात केली आहे. गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. करिता ३३ ऐवजी ३० रुपये दर देण्याचा निर्णय झाला आहे. खासगी व सहकारी दूध संघटनेच्या कोल्हापूर विभागातील डेअरी प्रतिनिधींची बैठक येथे झाली. या बैठकीत हा निर्णय झाला.
सध्याच्या दूध भुकटी, लोणी, दुधाचे बाजारातील खरेदी -विक्रीचे दर या बाबत सखोल चर्चा झाली. त्यानुसार हा निर्णय झाला. महाराष्ट्र शासनाचा ऑक्टोबरपासून गाय दूध खरेदीचा ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करिता किमान प्रतिलिटर दर २८ रुपये आहे.
तसेच संपूर्ण महाराष्ट्रात इतर संघ २७ ते २८ रुपये अशा दराने गाय दूध खरेदी करीत आहेत; परंतु फक्त कोल्हापूर जिल्ह्यात ३३ अधिक अंतिम दूध दर फरक असा जवळपास गाय दूध खरेदी दर सहा रुपये जास्त आहे.
त्यामुळे लोणी, दूध भुकटी याची उत्पादन किंमत जास्त येत असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही. तसेच सद्य:स्थितीत गाय व म्हैस दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
येथून पुढे देखील गाय दुधाची उपलब्धता चांगली असेल; परंतु दूध भुकटी व लोण्याच्या विक्रीच्या किमतीत कोणतीही वाढ दिसून येत नाही. अशा परिस्थितीत दूध खरेदी दर कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे सर्वांच्या बैठकीत एकमत झाले. बैठकीला राजारामबापू दूध संघ, गोकुळ दूध संघ, वारणा दूध संघ, भारत डेअरी व इतर दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.