Cow Milk Subsidy : अनुदानासाठी अटी कशाला; फॅटप्रमाणे पाच रुपये दर द्या, ३० टक्के गाय दूध उत्पादक वंचित

Cow Milk Rate : पशुपालन आणि दूध व्यवस्थापन व्यवसाय हा वाढलेले पशुखाद्य दर, महाग औषधोपचार आणि सकस चारा टंचाई यामुळे अडचणीत आला आहे.
Cow Milk Subsidy
Cow Milk Subsidyagrowon
Published on
Updated on

Cow Milk Producers : गायीच्या दुधाचे दर घसरल्याने राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्याची घोषणा केली. परंतु फॅट व एसएनएफ यासारख्या अटीमुळे अनेक दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे अनुदान देण्याऐवजी फॅटप्रमाणे प्रतिलिटर पाच रुपये वाढीव दर मिळावा. तसेच गाय, म्हैस विमा आणि औषधोपचारासाठी ठराविक रक्कम अनुदान स्वरूपात देण्याची मागणी दूध उत्पादकांकडून केली जात आहे.

गाय दूध संकलन वाढीसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली. परंतु, पशुपालन आणि दूध व्यवस्थापन व्यवसाय हा वाढलेले पशुखाद्य दर, महाग औषधोपचार आणि सकस चारा टंचाई यामुळे अडचणीत आला आहे. संकलन आणि दूध व्यवसाय वाढीसाठी गायीच्या दुधाचे दर वाढविण्याची मागणी केली जात आहे. परंतु, सरकार दरबारी अनेक दिवसांपासून मागणी प्रलंबित आहे.

राज्य सरकार बनावट आणि भेसळयुक्त दूधपुरवठा रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी जास्तीत जास्त गाय, म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. परंतु जाचक अटी लावून ५ रूपये अनुदानाची बोळवण केली जात असल्याची टीका आता शेतकरी वर्गातून होत आहे.

फॅट व एसएनएफच्या जाचक अटीमुळे ३० टक्के गाय दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे दूध उत्पादकांतून नाराजी व्यक्त होत आहे. गायीच्या दूध उत्पादकांना अनुदान मिळणार असले तरी ते दूध बिलाच्या वाटपानंतर धोरणानुसार मिळणार आहे. याचा तत्काळ फायदा गाय दूध उत्पादकांना होणार नाही. त्याचबरोबर यामध्ये विनाकारण वेळ जाणार आहे. दूध दरात वाढ केल्यास शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. दरात वाढ झाल्यामुळे दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येतील. गायीच्या दुधाच्या संकलनात मोठी वाढ होईल.

थेट उत्पादकाला फायदा गरजेचा

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकाच्या थेट खात्यात मिळणार आहे. परंतु यामध्ये संस्था सचिव, दूध संघ, बँक अधिकाऱ्यांचा वेळ खर्च होणार आहे. वेळेत यादी सादर न झाल्यास अनुदान जमा होण्यास आणखी वेळ लागणार आहे. याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. यापेक्षा वाढीव दूध दराचा फायदा दररोज गाय दूध उत्पादकांना मिळणार आहे. त्यामुळे अनुदानापेक्षा दरवाढ मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Cow Milk Subsidy
Milk Subsidy : दूध अनुदानासाठी ‘जनहित’चे टँकर अडवून आंदोलन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com