Agricultural Commodity Market : कापूस, हळदीतील भाववाढ टिकून

Agriculture Market Update : या सप्ताहात कापसाचे व सोयाबीनचे स्पॉट भाव वाढले. हळदीचे भावसुद्धा ७.३ टक्क्यांनी वाढले. १५ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
Agriculture
Agriculture Agrowon

Futures Market Prices :

डॉ. अरुण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती : सप्ताह ९ ते १५ मार्च २०२४

हरभऱ्याची आवक आता वाढू लागली आहे; मात्र अजूनही ती गेल्या दोन वर्षांतील या महिन्याच्या तुलनेने ३५ टक्क्यांनी कमी आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे. कापसातील भाववाढ टिकून आहे. या सप्ताहात कापसाचे व सोयाबीनचे स्पॉट भाव वाढले. हळदीचे भावसुद्धा ७.३ टक्क्यांनी वाढले. १५ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात रु. ६१,३४० वर आले होते. या सप्ताहात ते पुन्हा ०.४ टक्क्याने वाढून रु. ६१,५८० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव मात्र २.५ टक्क्यांनी घसरून रु. ६३,३४० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.५ टक्क्यांनी कमी आहेत. कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ४ टक्क्यांनी वाढून रु. १,५३४ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,६५५ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात ०.१ टक्क्याने कमी होऊन रु. २,२३८ वर आले आहेत. फ्यूचर्स (एप्रिल) किमती रु. २,२५३ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. २,२८१ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.५ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९०आहे.

Agriculture
Agriculture Commodity Market : सोयाबीन, हरभरा उतरले; हळद तेजीत

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १५,४१४ वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या ७.३ टक्क्यांनी वाढून रु. १६,५३३ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती २.४ टक्क्यांनी घसरून रु. १७,६५० वर आल्या आहेत. जून किमती रु. १७,८९४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ८.२ टक्क्यांनी जास्त आहेत. ऑगस्ट किमती (रु. १८,८००) १३.७ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात १.७ टक्क्याने घसरून रु. ५,७७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ५,६५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक वाढत आहे.

Agriculture
Agriculture Commodity Market : शेतीमाल व्यापारासाठी बीएसई ई-अॅग्रिकल्चरल मार्केट्स लिमिटेड

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ९१७५ वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.९ टक्क्याने घसरून रु. ४,५७० वर आली होती. या सप्ताहात ती १.७ टक्क्याने वाढून रु. ४,६४६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ९,५९५ वर आली होती. या सप्ताहात ती ०.३ टक्क्याने घसरून रु. ९,५६५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,७५० होती; या सप्ताहात ती रु. १,६०४ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,००० वर आली होती. या सप्ताहात ती रु. १,२०० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची

किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com