Cotton Market : बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री

Cotton Sale Update : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डमध्ये चालू हंगामातील कापूस विक्रीचा प्रारंभ शनिवारपासून (ता. १६) होत आहे. मुख्य बाजार आवारात आठवड्यातील बुधवारी व शनिवारी या दिवशी सकाळी ११.३० वाजता लिलाव घेतले जातील.
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डमध्ये चालू हंगामातील कापूस विक्रीचा प्रारंभ शनिवारपासून (ता. १६) होत आहे. मुख्य बाजार आवारात आठवड्यातील बुधवारी व शनिवारी या दिवशी सकाळी ११.३० वाजता लिलाव घेतले जातील, अशी माहिती बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे यांनी दिली.

Cotton Market
Cotton Market : दर्यापूर बाजार समिती यार्डवर होणार कापूस लिलाव

बारामती मुख्य यार्डमध्ये दरवर्षीप्रमाणे कापसाचे लिलाव उघड पद्धतीने होत असतात. तसेच शेतीमालाचे वजन लिलावापूर्वी आणि त्यानंतर लिलाव अशी पद्धत असल्याने शेतकऱ्यांनी आपला माल चांगल्या पॅकिंगमध्ये आणि स्वच्छ व ग्रेडिंग करून आणावा.

Cotton Market
Cotton Market : कापूस बाजारात सुधारणेचे संकेत

कापसाची लागवड परिसरात वाढत असल्याने बारामती बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी २०२२ पासून कापसाचे उघड लिलाव पद्धत सुरू केली आहे. या कालावधीत १६०० क्विंटलची आवक होऊन कापसाला कमाल ९३०० रुपये तर सरासरी ६९५१ रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

आवारातील अडते तसेच स्थानिक व बाहेरील खरेदीदार असल्याने या वर्षी कापसाला योग्य व सर्वाधिक दर मिळतील, अशी अपेक्षा आहे. बारामती बाजार आवारात कापसास प्रतवारीनुसार योग्य दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस खासगी बाजारपेठेत विक्री न करता बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com