Cotton Market : दर्यापूर बाजार समिती यार्डवर होणार कापूस लिलाव

Cotton Auction : २५ नोव्हेंबरपासून प्रारंभ; सभापती सुनील गावंडे यांची माहिती
Cotton Market
Cotton MarketAgrowon
Published on
Updated on

Amravati News : अमरावती : दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची कापूस नियोजनात्मक बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यात विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यामध्ये २५ नोव्हेंबरपासून दर्यापूर बाजार समिती यार्डवर कापसाचा लिलाव करण्यात यणे ार असल्याचे सभापती सुनील गावंडे यांनी सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर कापूस शेतमाल वगळता सर्व शेतमालाचा खुल्या पद्धतीने सर्रास होत असतो. त्याच पद्धतीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस शेतमाल विक्रीदेखील सर्रास पद्धतीने व्हावी, असा आवाज शेतकऱ्यांमधून येत होता. तसेच बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडावी, यादृष्टीने २६ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची कापूस नियोजनात्मक बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये सोमवार २५ नोव्हेंबर २०२४ पासून शेतकऱ्यांनी आपला कापूस हा सर्वप्रथम बाजार समिती यार्डवर आणनू त्याची नोंद करून टोकन घेऊन सर्रास करून बाजार समितीची सौदापट्टी घेऊन गाड्या जिनिंगवर मोजमापाकरिता न्याव्या व नाममात्र १० रुपये दरात बाजार समितीची काटापट्टी बाजार समिती कर्मचाऱ्यांकडून घ्यावी.

Cotton Market
Cotton Market : परभणी बाजार समितीत कापूस लिलाव ३० जूनपर्यंत सुरू राहणार

त्याठिकाणी देखरेखकरिता बाजार समितीचे सिक्युरिटी गार्ड राहतील, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्याचे बाजार समितीने ठरवले. यामध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असेल, असे संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांनी सांगितले. यासोबतच सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीला सहकार करावे, असे आवाह ्य नदेखील त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com