Agriculture Commodity Market : सोयाबीन वगळता सर्व पिकांमध्ये घसरण

Soybean Rate : सोयाबीन व कापूस यांच्या आंतरराष्ट्रीय किमती घसरण्याचा कल याआधी होताच; त्यात आता अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धाची भर पडली आहे.
Soybean Market
Soybean Market Agrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती : सप्ताह १ ते ७ मार्च, २०२५

१ मार्चपासून NCDEX मध्ये एप्रिल २०२६ डिलीवरीसाठी कपाशीचे व जुलै २०२५ डिलिव्हरीसाठी मक्याचे व्यवहार सुरू झाले. MCX मध्ये सप्टेंबर २०२५ डिलीवरीसाठी कापसाचे व्यवहार सुरू झाले. त्यामुळे मार्चमध्ये NCDEX मध्ये कपाशीचे एप्रिल २०२५, नोव्हेंबर २०२५, फेब्रुवारी २०२६ व एप्रिल २०२६ डिलिव्हरीसाठी, तर मक्याचे मार्च, एप्रिल, मे, जून व जुलै २०२५ डिलिव्हरीसाठी आणि हळदीचे एप्रिल, मे, जून व ऑगस्ट २०२५ डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू आहेत. MCX मध्ये कापसाचे मार्च, मे, जुलै व सप्टेंबर २०२५ डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू आहेत.

सोयाबीन व कापूस यांच्या आंतरराष्ट्रीय किमती घसरण्याचा कल याआधी होताच; त्यात आता अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धाची भर पडली आहे. २७ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२५ दरम्यान अमेरिकेतील सोयाबीनच्या किमती ३.८ टक्क्यांनी, तर कापसाच्या किमती ३ टक्क्यांनी घसरल्या.

देशातील बाजार समितीत हरभऱ्याची आवक या सप्ताहात जोराने सुरू झाली आहे. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात देशातील एकूण हरभरा आवक ८,६०० टन होती; २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात एकूण आवक वाढून ९९,४०० टन झाली. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ४८ टक्के आहे; त्याखालोखाल गुजरात (१७ टक्के), मध्य प्रदेश (१७ टक्के) व कर्नाटक (११ टक्के) या राज्यांचा क्रम लागतो. महाराष्ट्रात हिंगणघाट, अमरावती, जालना, अंमळनेर व अकोला या बाजार समित्या प्रमुख आहेत.

या सप्ताहात सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या किमती घसरल्या. सोयाबीनच्या किमती ०.६ टक्का वाढल्या. हरभऱ्याच्या किमती आता हमीभावाइतक्या आल्या आहेत. वाढत्या आवकेमुळे त्या पुढील काही दिवसांत कमी होण्याचा संभव आहे.

४ मार्च २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.६ टक्का घसरून रु. ५३,०८० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव १.५ टक्क्याने घसरून रु. ५४,००० वर आले आहेत. जुलै भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.५ टक्क्यांनी अधिक आहेत.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात ०.१ टक्क्याने घसरून रु. १,४०२ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४७६ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.२ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.

Soybean Market
Maize Market: खानदेशात मका आवक कमी; सरासरी दर १८०० रुपये क्विंटल

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २,३०० वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती ०.१ टक्क्याने घसरून रु. २,३१९ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स रु. २,३४७ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव २ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात ३.५ टक्क्यांनी घसरून रु. १२,४०० वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती ५.५ टक्क्यांनी घसरून रु. ११,७६८ वर आल्या आहेत. मे किमती रु. ११,७९४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ४.९ टक्क्यांनी कमी आहेत.

Soybean Market
Soybean Farmer's Loss : राज्यातील सोयाबीन उत्पादकांचे पाच हजार कोटींचे नुकसान

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात १.३ टक्क्याने घसरून रु. ५,८०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी घसरून रु. ५,६५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे. आवक वाढती आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,९०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. मुगाचा हंगाम आता संपला आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.६ टक्का घसरून रु. ४,१९२ वर आली होती. या सप्ताहात ती ०.६ टक्क्याने वाढून रु. ४,२१७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे.

तूर

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) ०.४ टक्क्याने वाढून रु. ७,६४६ वर आली होती. या सप्ताहात ती ०.१ टक्क्याने कमी होऊन रु. ७,६३७ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव बसवंत) किंमत या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने ०.७ टक्क्याने घसरून रु. २,१३५ वर आली आहे. कांद्याची आवक टिकून आहे; रब्बी कांद्याची आवक एप्रिलपासून सुरू होईल.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ९३८ वर आली होती; या सप्ताहात ती रु. १,००० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com