
Nagpur News : जागतिक बाजारात सोयाबीन पेंडला अपेक्षीत भाव नाही. त्यामुळे भारतात देखील सोयाबीन ४८९२ रुपयांच्या हमीभावापेक्षा कमी दराने विकले जात आहे. या व्यवहारात हमीभावापेक्षा प्रती क्विंटल एक हजार रुपये सोयाबीन उत्पादकांना कमी मिळत आहेत. एकूण राज्याचा विचार करता सोयाबीन उत्पादकांना पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले, असा दावा शेतीमाल विपणन विषयाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला आहे.
जावंधिया यांच्या माहितीनुसार, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन बाजारात मंदीचे वारे वाहत आहेत. भारत सरकारने सोयाबीन करीता ४८९२ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु प्रत्यक्षात खुल्या बाजारात सोयाबीनला ४००० ते ४३०० रुपये प्रति क्विंटल असाच दर मिळत आहे. बाजारात कमी दर मिळत असल्याने सोयाबीन उत्पादकांमध्ये रोष होता. त्याची दखल घेत सरकारने हा रोष कमी करता यावा याकरीता खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार खाद्यतेलावर २० टक्के आयात शुल्क लावण्यात आले.
परंतु हा निर्णय देखील सोयाबीन उत्पादकांसाठी फारसा दिलासादायक ठरणार नव्हता. यामुळे दरात प्रति क्विंटल २०० रुपयांपर्यंतच वाढ होईल, असे आधीपासून सांगितले जात होते. त्यानुसार खाद्यतेल आयात शुल्क लागू केल्यानंतर देखील सोयाबीनमध्ये फारसी तेजी दिसली नाही. कारण सोयाबीनचे भाव हे सोया पेंडच्या दरावर ठरतात.
आज अमेरिकेत सोयाबीनचे भाव १५-१६ डॉलर प्रति बुशेलवरून (२८ किलो) ९-१० डॉलर प्रति बुशेलवर आले आहेत. त्याचवेळी सोया पेंडचे भाव ४५० डॉलर प्रति टनवरून ३२५ डॉलर प्रति टनपर्यंत खाली आले आहेत. भारताच्या घाऊक बाजारात देखील खाद्य तेल १२० ते १३० रुपये किलो व पेंड ३५०० रुपये प्रति क्विंटलच आहे. त्यामुळेच सोयाबीनला ४००० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिकचा भाव मिळणे शक्यच नाही.
त्यातच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार यद्धाची घोषणा केली आहे. जशाश तसे आयात कर लावण्याचा इशारा देत भारताला कर कमी करण्याचा इशारा दिला आहे. चीनवर त्यांनी २० टक्के आयात कर लावला आहे तर चीनने देखील अमेरिकेच्या सोयाबीन, पोल्ट्री, धान्य यावर २० टक्के आयात कर लावला आहे. त्याचा परिणाम अमेरिकेतील शेतीमालाच्या दरावर होण्याची भीती वर्तविली जात आहे.
हमीभावापेक्षा १ हजार रुपये कमी
जावंधिया यांच्या मतानुसार, महाराष्ट्रात ५० लाख हेक्टर (एक कोटी २५ लाख एकर) क्षेत्रावर सोयाबीन लागवड होते. एकरी चार क्विंटलची उत्पादकता अपेक्षित धरता या क्षेत्रातून पाच कोटी क्विंटल सोयाबीन उत्पादकता मिळते. सोयाबीनला ४८९२ रुपयांचा हमीभाव असताना खुल्या बाजारात प्रति क्विंटल एक हजार रुपये कमी मिळत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.