Cotton Market : कापूस दरात १०० रुपयांची सुधारणा; वायद्यांमध्ये आठवड्याच्या शेवटी मोठी वाढ

Cotton Rate Update : देशातील बाजारात मागील दोन महिन्यांमध्ये केवळ वायद्यांमध्ये सुधारणा दिसत होती. पण कालपासून केवळ वायद्यांमध्येच नाही तर बाजार समित्यांमध्येही कापूस दरात सुधारणा दिसली.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Production : देशातील बाजारात मागील दोन महिन्यांमध्ये केवळ वायद्यांमध्ये सुधारणा दिसत होती. पण कालपासून केवळ वायद्यांमध्येच नाही तर बाजार समित्यांमध्येही कापूस दरात सुधारणा दिसली. आज अनेक बाजारांमध्ये कापूस दर १०० रुपयांनी वाढले होते. तर वायद्यांमधील वाढ १२४० रुपये होती

शुक्रवारी, म्हणजेच आठवड्याच्या शेवटी देशातील वायद्यांमध्ये चांगली सुधारणा झाली. काल जून महिन्याचा शेवटचा दिवसही होता. शुक्रवारी जूनचे वायदे बंद झाले. ऑगस्ट महिन्याच्या डिलेव्हरीचे वायद्यामध्ये झालेली वाढ गेल्या काही महिन्यातील उचांकी होती.

काल एमसीएक्सवर ऑगस्टच्या वायद्यात १ हजार २४० रुपयांची वाढ झाली. एवढी वाढ एकाच दिवसात मागील अनेक महिन्यांमध्ये दिसली नाही. शुक्रवारी वायदे ५७ हजार २६० रुपयांवर बंद झाले. एमसीएक्सवर खंडीमध्ये वायदे होतात. एक खंडीमध्ये ३५६ किलो रुई असते.

देशातील वायद्यांमध्ये सुधारणा होत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे जवळपास २ टक्क्यांनी वाढले होते. वायद्यांमध्ये दीड सेंटने वाढ झाली होती. शुक्रवारी इन्टरकाॅन्टीनेंटल एक्सचेंज अर्थात आयसीईवर कापूस वायदे ८०.३८ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते.

Cotton Market
Cotton Production : कापूस उत्पादनवाढीचे महत्त्वाचे मुद्दे

तब्बल ९ दिवसांनंतर कापूस वायद्यांना हा टप्पा गाठला होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा देशातील वायद्यांमध्ये झाली वाढ जास्त होती.

कापूस आवकेचा विचार करता, सध्या होणारी आवक सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. याचं कारण आपण सगळ्यांना माहीतच आहे. यंदा शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला होता. त्यामुळे सध्याची आवक जास्त दिसते.

जुलैच्या पहिल्या आठवड्यातील सरासरी आवक ४ ते ५ हजार गाठींच्या दरम्यान असते. पण सध्या आवक ४० हजार गाठींच्या दरम्यान आहे. कापूस दर दबावातच राहत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी कापूस विकताना दिसत आहेत.

कापूस आवक

चालू हंगामात आतापर्यंत म्हणजेच १ ऑक्टोबर ते ३० जूनपर्यंत कापूस आवकेचा विचार करता यंदाची आवक आता गेल्यावर्षीपेक्षा जास्त दिसते. काही संस्थांच्या मते या काळात गेल्यावर्षी २ लाख ६५ हजार गाठींची आवक झाली होती.

तर यंदा या काळातील आवक २ लाख ७८ हजार गाठींवर पोचली. तर भारतीय कापूस महामंडळाच्या मते देशात २६ जूनपर्यंत ३०२ लाख गाठी कापूस बाजारात आला होता.

Cotton Market
Cotton Production : कापूस उत्पादनवाढीचे महत्त्वाचे मुद्दे

बाजार कसा राहीला?

शेतकऱ्यांकडेही आता कमी कापूस शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काळात आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. देशातील बाजार वायद्यांमध्ये चांगली वाढ झाल्यानंतर बाजार समित्यांमध्येही भाव वाढले. आज कापूस दरात १०० ते १५० रुपयांची सुधारणा दिसली.

कापसाला आज सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळाला. ही वाढ सोमवारी कायम दिल्यास दरात आणखी सुधारणा दिसू शकेल. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्याचाही आधार मिळू शकतो. पण बाजारात काय स्थिती राहील हे सोमवारीच स्पष्ट होईल, असे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com