Shahada APMC : शहादा बाजार समितीमध्ये कापूस लिलावाला दणक्यात सुरुवात

Cotton Auction: नंदूरबार जिल्ह्यातील शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ झाला.
Shahada APMC
Shahada APMCAgrowon
Published on
Updated on

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा कृषी उत्पन्न बाजार (APMC) समितीमध्ये या हंगामातील कपाशी खरेदीला सुरवात झाली. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील (anil Patil )यांच्या हस्ते कापूस खरेदीचा (Cotton Auction) शुभारंभ करण्यात आला. बाजारपेठेत कापसाला कापसाला ६७०० ते ७२०० पर्यंत दर मिळत भाव मिळाला.

Shahada APMC
Cotton Market News : हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी

यंदा माॅन्सूनच्या पावसाचा खंड पडला आहे. त्याचबरोबर लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कापशीच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे कापसाच्या खरेदी दरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरी शेतकऱ्यांनी आता दिवाळी आणि दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर कापूस विक्रीला सुरुवात केली आहे. पण खाजगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडल्याने शेतकरी नाराज आहेत. अशा परिस्थितीत शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समितीच्या वतीने कापूस खरेदी सुरू झाली.

दसऱ्याच्या तोंडावर कापसाला चांगला भाव मिळाल्याने खऱ्या अर्थाने हा शुभमुहूर्त ठरल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाजार समितीत प्रथम कापूस आणणाऱ्या शेतकऱ्यांचा पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बाजार समितीत शेतकऱ्यांना शासकीय दराप्रमाणे दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, त्या साठी शेतकऱ्यांनी कापसाचे गुणवत्ता कायम ठेवावी, असे आवाहन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.

Shahada APMC
Farmer Protest : कापूस-सोयाबीन दरासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक; सरकारचा केला प्रतीकात्मक दशक्रिया विधी!

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाला शहादा तालुक्यातील शेतकरी आणि कापूस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे कापसाचे उत्पादन कमी झाले असून येत्या काळात कापसाचे दर वाढण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com