Climate Change : हवामान बदलावर विचारमंथन करणारी ‘कॉप’

Environment Conservation : अझरबैजानची राजधानी बाकू येथे ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ‘कॉप २९’ ही १९६ देशांची परिषद चालू आहे. हवामान बदलावर कृती करण्यासाठी निर्णय घेणारी ‘कॉप’ ही सर्वोच्च संस्था असून, ही दरवर्षी सहभागी राष्ट्रांसोबत एकत्रित येऊन झालेल्या निर्णयावर आढावा आणि पुढील दिशा निश्‍चित करते.
Environment Conservation
Environment ConservationAgrowon
Published on
Updated on

Climate Change : हवामान बदल आणि त्यामुळे होणारे परिणाम याची जागतिक स्तरावर गेल्या ३० ते ४० वर्षांपासून चर्चा होते आहे. हा प्रश्‍न वैश्‍विक असला तरी त्याचे उत्तर स्थानिक स्तरावर निश्‍चित करणे आवश्यक ठरते.

तथापि, जागतिक स्तरावर सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन त्यावर चर्चा करणे, आव्हानांची तीव्रता, त्याचे होणारे परिणाम, त्याचे गांभीर्य यांचा विचार करून सर्व सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आपापल्या देशाच्या ध्येय धोरणांमध्ये अनुकूल बदल करून हवामान बदलाच्या संकटाशी सामना करणे आणि त्याच्याशी जुळवून घेणे हे क्रमप्राप्त ठरते.

हवामान बदलाचे परिणाम आणि तीव्रता गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहेत. त्याचे परिणाम तापमानातील प्रचंड वाढ तसेच हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूंची वाढलेली तीव्रता या स्वरूपात भासते.

शहरे अर्बन डोम

भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये याची तीव्रता थोडी अधिकच भासेल. कारण देशातील सर्वांत अधिक शहरीकरण असलेला भूभाग म्हणजे महाराष्ट्र. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ५५ टक्के ग्रामीण भाग आणि ४५ टक्के नागरी भाग होता. कदाचित तो आता ५० ते ५० टक्के असा समसमान झाला असण्याची शक्यता आहे. याचे परिणाम वाहतुक, रस्ते बांधणी, दळणवळणावर निश्‍चितच होतात.

Environment Conservation
Climate Change : हवामान बदलासंदर्भात श्रीमंत देश खिशात हात घालणार?

कारण शहरांमध्ये संसाधने ही अधिक लागतात. याचे परिणाम म्हणून जीवाश्म इंधनावर चालणारे म्हणजे पेट्रोल, डिझेल, गॅसवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणावर या शहरातून आलेली आहेत. त्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण हे शहराच्या हवामानाला अत्यंत हानिकारक ठरत आहे, हे निर्विवाद सत्य आहे. तापमान वाढ हे त्याचे काही दृश्य परिणाम आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे जलस्रोतांवर आणि अन्नसुरक्षेवर विपरीत परिणाम होतो आहे.

हवामान बदलांचे मंथन

कॉप ही हवामान बदलावर निर्णय घेणारी संयुक्त राष्ट्राची सर्वोच्च संस्था आहे. शिखर परिषद असल्यामुळे यामध्ये आतापर्यंत झालेल्या परिषदांमधून ज्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली, त्यावर पुनर्विचार करणे आणि त्याचे पुनर्निर्धारण करणे हेही अपेक्षित आहे.

विशेषतः पॅरिस करारावर सर्व सदस्य राष्ट्रांनी चर्चा करून पुढील उद्देश निर्धारित करत आहेत. (यामध्ये अमेरिका आणि चीन ही राष्ट्रे सहभागी होत आहेत.) विशेषत: मिथेन वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी काय पावले उचलली आहेत, या संदर्भातही चर्चा होईल.

संयुक्त राष्ट्र संघाच्या UNFCC च्या पक्षांची परिषद. ही २९ वी संयुक्त राष्ट्र संघाची हवामान बदलाची परिषद आहे. सध्या अझरबैजानची राजधानी बाकू येथे ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ‘कॉप २९’ ही बैठक चालू आहे. हवामान बदलावर कृती करण्यासाठी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे, जी दरवर्षी सहभागी राष्ट्रांसोबत एकत्र येत झालेल्या निर्णयावर आढावा आणि पुढील दिशा निश्‍चित करते.

पॅरिस करार /संधी

पॅरिस करार हा तापमान वाढीच्या नियंत्रणसाठीचे दीर्घ कालीन उद्दिष्ट निर्धारित करते. पॅरिस करारामध्ये काही महत्त्वाच्या बाबी घडल्या. त्यात हवामान बदलाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्राचे सुमारे १५४ देश सहभागी आहेत. (आता त्यांची संख्या १९६ आहे.) हवामान बदलाच्या परिणामाशी जुळवून घेणे. त्यांची तीव्रता कमी करणे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणे.

Environment Conservation
Climate Change Organizations : हवामान बदलात महिलांचीच होरपळ अधिक

महत्त्वाचे निर्णय

जागतिक तापमान वाढीवर आळा घालण्यासाठी किमान २ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान कमी करावे, असे निर्धारित करण्यात आले. आणि ते एक दशांश पाच अंश सेल्सिअसपर्यंत निम्नस्तरावर आणावे अशीही चर्चा झाली.

बाकू शहराविषयी..

बाकू ही पश्‍चिम आशियातील अझरबैजान देशाची राजधानी.

अझरबैजानचे आर्थिक, सांस्कृतिक व व्यापारी केंद्र.

बाकू  शहर येथील खनिज तेलाच्या विहिरींसाठी महत्त्वपूर्ण मानले गेले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी बाकूचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत करण्यात आला आहे.

‘कॉप’ काय आहे ? ः

Cop (conservation of parties), अथवा सहभागी राष्ट्रांची बैठक असे म्हणतात. संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामान बदलाच्या कृती कार्यक्रमांतर्गत पहिली वसुंधरा परिषद (वर्ल्ड अर्थ समिट) रिओ दि जानेरो येथे १९९२ मध्ये झाली. त्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या एका परिषदेने एकूण १५४ देशांनी एकत्र घेऊन हवामान बदलांच्या परिणामाचा अभ्यास आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या बदलांचा सामना करणे यासाठी व्यासपीठाची स्थापना केली. यांची सर्वोच्च संस्था म्हणजे ‘कॉप’.

‘कॉप’ची उद्दिष्टे

हरितगृह वायू (ग्रीनहाउस गॅस) स्थिर करणे.

जलवायू परिवर्तनाचे परिणाम कमी करणे.

जलवायू परिवर्तनाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी अनुकूलन.

जलवायू कृतीसाठी आर्थिक साह्य करणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com