Co-Operative Institution : ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’ अभियानाची जिल्ह्यात धडाक्यात सुरुवात

International Co-Operative Year : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सहकारी संस्था सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करावी.
Chh. Sambhajinagar Collector Office
Chh. Sambhajinagar Collector Office Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात येत्या मार्च महिन्या अखेर ज्या ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात सहकारी संस्था कार्यान्वित नाही तेथे संस्था कार्यान्वित करण्यात यावी. त्यासाठी जिल्ह्यात ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.

जिल्हा सहकार विकास समितीची बैठक मंगळवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, क्षेत्रिय व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन शा. ना. साळे, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी मनीषा हराळ मोरे, जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश महाडीया, सहा. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अमोल शेळके, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अजय मोटे, विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध के. एम. शहा, सह निबंधक डॉ. ए. बी. काशीकर तसेच अन्य विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Chh. Sambhajinagar Collector Office
Cooperative Department : अवैध धान्य खरेदीविरोधात सहकार विभागाचे धाडसत्र

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सहकारी संस्था सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करावी. ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया आटोपली पाहिजे. ज्या ग्रामपंचायतीत संस्था नाहीत अशा ग्रामपंचायतींची यादी करून प्रक्रिया सुरु करावी.

त्याशिवाय जिल्ह्यात दुग्धोत्पादन, दुधावरील प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात सहकारी संस्थांना चालना द्यावी. त्याच प्रमाणे पोल्ट्री, डेअरी या क्षेत्रालाही चालना देऊन त्यात सहकारी संस्थांचा सहभाग वाढवावा. संस्थांच्या बळकटीकरणासाठी उपक्रम राबवावे. याद्वारे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती उपक्रमांना चालना द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Chh. Sambhajinagar Collector Office
Cooperative Department : अवैध धान्य खरेदीविरोधात सहकार विभागाचे धाडसत्र

बैठकीत सहकार विभागांतर्गत येणाऱ्या केंद्रीय योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात नवीन विविध कार्यकारी सेवा सोसायट्या स्थापन करणे, विविध कार्यकारी सेवा संस्थांनी नावीन्यपूर्ण व्यवसाय सुरू करणे. डेअरी, मत्स्य व्यवसाय, जनऔषधी केंद्र, धान्य गोदामे, खते-बी-बियाणे, पेट्रोल पंप इ. गोदाम बांधकामांसाठी प्रस्ताव तयार करणे, आपले सेवा केंद्र सारखे सेवा केंद्र सुरू करणे. धान्य खरेदी केंद्र सुरु करता यावे यासाठी विविध तांत्रिक बाबींची पूर्तता करणे अशा विविध विषयांबाबत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात ६९२

सहकारी संस्था

जिल्ह्यात ६९२ सहकारी संस्था असून त्यात ३०५ संस्थांचे संगणकीकरण करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या सर्व संस्थांना संगणक व सहसाहित्य पुरवठा करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे १३३ सार्वजनिक सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. संस्थांच्या गटसचिवांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. जिल्ह्यात सहकारी संस्थांमध्ये २ जनऔषधी केंद्र, ४ धान्य साठवण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com