Cooperative Department : अवैध धान्य खरेदीविरोधात सहकार विभागाचे धाडसत्र

Illegal Grain Procurement : विनापरवाना शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सहकार विभाग अ‍ॅक्शन मोडवर आला आहे.
Grain
GrainAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : विनापरवाना शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी केला जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सहकार विभाग अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. विना परवाना शेतीमाल खरेदी करणाऱ्यांवर सहकार विभागाने धाडसत्र सुरू केले असून, जिल्हाभरात मोहीम राबविली जाणार आहे.

शेतीमाल बाजारात यायला सुरुवात झाली असून, त्यामुळे काही व्यापारी विना परवाना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीमालाची खरेदी करताना दिसत आहेत. यात शेतकऱ्यांची फसगत होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या यार्डामधूनच शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करावा, असा नियम आहे.

Grain
Crop Insurance : अमरावतीतील चारच महसूल मंडलाना मिळणार अग्रिम विमा

यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. यातून बाजार समितीला शुल्क मिळते. अनेकांजवळ शेतीमाल खरेदीबाबतचा परवाना घेतलेला नाही. शेतकऱ्यांची अडचण होऊ नये, बाजार समितीला शुल्क मिळावे, यासाठी सहकार विभाग अ‍ॅक्शन मोडवर आला आहे.

Grain
Crop Insurance : रोह्यात पीकविमा रकमेची प्रतीक्षा

शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजार समितीच्या यार्डात याव्यात, यासाठी विना परवाना धान्य खरेदी करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. वणी विभागातून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. विना परवाना खरेदी करणाऱ्यांवर साहाय्यक निबंधक कार्यालयाने सोमवारी (ता.२०) कारवाई केली आहे. मंगळवारी (ता.२१) काही ठिकाणी सहकार विभागाने धाडसत्र राबविल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी सहकार विभागाने विना परवाना खरेदी करणाऱ्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. जिल्हाभरात ही मोहीम राबविली जाणार आहे. बाजार समितीला कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांची फसगत होऊ नये, यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे.
- नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com