Soybean Pest Management : सोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापन

Soybean Crop Pest Control : सद्यःस्थितीमध्ये सोयाबीन पिकावर चक्रभुंगा, हिरवी उंट अळी, केसाळ अळी, पांढरी माशी अशा विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
Soybean Pest
Soybean PestAgrowon
Published on
Updated on

डॉ. एस. बी. महाजन, डॉ. एम. पी. देशमुख

सद्यःस्थितीमध्ये सोयाबीन पिकावर चक्रभुंगा, हिरवी उंट अळी, केसाळ अळी, पांढरी माशी अशा विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कीड नियंत्रणासाठी प्रादुर्भाव ओळखून वेळीच उपाय करावेत.

चक्रभुंगा

मादी भुंगा पानाच्या देठावर, फांदीवर किंवा खोडावर दोन चक्र काप करून छिद्रात अंडी घालते. त्यामुळे चक्राचा वरील भाग वाळतो.

किडीची अळी देठ, फांदी व खोड पोखरून पोकळ करते.

प्रादुर्भावग्रस्त झाड सुरुवातीला इतर झाडांसारखे दिसते. त्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही.

शेंगा धरण्याच्या प्रमाणात, दाण्याच्या संख्येत आणि वजनात अनुक्रमे ५३,५६ व ६६ टक्क्यांपर्यंत घट येते.

Soybean Pest
Soybean Pest infestation : सोयाबीनवर पाने, शेंगा खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

आर्थिक नुकसान पातळी

फुलोऱ्यापूर्वी ३ ते ५ चक्रभुंगा प्रति मीटर ओळीत.

फवारणी (प्रतिलिटर पाणी)

प्रोफेनोफॉस (५० ई.सी.) २ मिलि किंवा

थायाक्लोप्रिड (२९.७ एससी) १.५ मिलि किंवा

इथिऑन (५० ई.सी.) १.५ ते ३ मिलि किंवा

क्लोरॲन्ट्रॉनिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि असिटामिप्रीड (२५ टक्के) अधिक बायफेन्‍थ्रीन (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.५ मिलि (संयुक्त कीटकनाशक)

केसाळ अळी

अळी अधाशीपणे पानाच्या मागील बाजूस राहून हरितद्रव्य खाते. अशी पाने जाळीदार होतात.

जास्त प्रादुर्भावामध्ये झाडाचे फक्त खोड शिल्लक राहते.

आर्थिक नुकसान पातळी

फुलोऱ्यापूर्वी १० अळ्या प्रति मीटर ओळीत.

उपाययोजना

अंडीपुंज असलेली पाने, जाळीदार पाने त्यावरील अळ्यांसह गोळा करून नष्ट कराव्यात.

फवारणी (प्रतिलिटर पाणी)

क्लोरपायरीफॉस (२० ई.सी.) २ मिलि

हिरवी उंट अळी

अळी शरीराचा मधला भाग उंच करून चालते.

अळी पानाचा हिरवा भाग खरवडून खाते. त्यानंतर पानाच्या सर्व भाग खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवते.

अळ्या फुलांचे व शेंगाचे जास्त नुकसान करतात.

Soybean Pest
Soybean Pest Control: पावसाळ्यातील सोयाबीन पिकावरील किड-रोग नियंत्रण

आर्थिक नुकसान पातळी

४ लहान अळ्या प्रति मीटर ओळीत

उपाययोजना

सोयाबीन पिकाच्या बाजूने एरंडी या सापळा पिकाची एक ओळ लावावी.

फवारणी (प्रतिलिटर पाणी)

प्रोफिनोफॉस (५० ई.सी.) २ मिलि किंवा

क्लोरॲन्ट्रॉनिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा

इन्डोक्झाकार्ब (१५.८ एसी) ०.६६ मिलि किंवा

ॲसिटामीप्रीड (२५ टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (२५ टक्के) (डब्ल्यूजी) (संयुक्त) ०.५ ग्रॅम

पांढरी माशी

पानाच्या खालील बाजूस राहून रस शोषते. त्यामुळे झाडाच्या वाढीवर परिणाम होतो.

पिवळा मोझॅक या रोगाच्या विषाणूचा प्रसार पांढरी माशीमार्फत होतो. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते.

पावसाने ओढ दिली किंवा पाण्याचा ताण पडल्यास प्रादुर्भाव वाढतो.

उपाययोजना

एकरी १५ ते २० पिवळे चिकट सापळे लावावेत.

फवारणी (प्रतिलिटर पाणी)

डायफेन्थुरॉन (४७.८ एसपी) १ मिलि

ॲसिटामीप्रीड २५ टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (२५ टक्के) (डब्ल्यूजी) (संयुक्त) ०.५ ग्रॅम

- डॉ. एस बी. महाजन, ९४२११२८३३३

(कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली

(लेखातील सर्व कीटकनाशके आणि बुरशीनाशकांना लेबलक्लेम आहेत.)

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.  फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.  खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.  बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.  लेबल क्लेम वाचावेत.  पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.  रसायनांचा गट तपासावा.  पीएचआय, एमआरएल तपासावेत.  पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com