Agrowon Grape Expo : द्राक्ष तंत्रज्ञान अनुभविण्याची आज प्रदर्शनात शेवटची संधी

Grape Technology : नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादन व निर्यातीत देशभरात अग्रक्रमावर आहे. त्याच अनुषंगाने नाशिक शहरात ‘ॲग्रोवन एक्सक्ल्यूझिव्ह ग्रेप एक्स्पो-२०२३’चे आयोजन करण्यात आले आहे.
Agrowon Grape Expo
Agrowon Grape ExpoAgrowon
Published on
Updated on

Nashik News : द्राक्ष शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानासमवेत राज्यातील सर्व सृजनशील द्राक्ष उत्पादकांसाठी ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान नाशिक येथील ठक्कर्स डोम, एबीबी सर्कलजवळ, त्रंबक रोड येथे आयोजित तीनदिवसीय द्राक्ष प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची कृषी पर्वणी ठरत आहे. आज (ता. २) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. या प्रदर्शनात द्राक्ष पिकासंबंधी विविध उपयुक्त माहिती घेण्यासाठी व तंत्रज्ञान अनुभवण्यासाठी द्राक्ष उत्पादकांनी भेट दिल्या.

नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादन व निर्यातीत देशभरात अग्रक्रमावर आहे. त्याच अनुषंगाने नाशिक शहरात ‘ॲग्रोवन एक्सक्ल्यूझिव्ह ग्रेप एक्स्पो-२०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आज (ता. २) द्राक्ष पिकासंदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. द्राक्ष उत्पादकांच्या गरजा व त्यावर उपाय देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरत आहे.

Agrowon Grape Expo
Agrowon Grape Expo : एकाच छताखाली द्राक्षाचे सर्वकाही !

प्रदर्शन पॉवर्ड बाय ऑरचिड कंपनी आहे. तर सहप्रायोजक ॲग्री सर्च (इंडिया) प्रा. लि., आनंद ॲग्रो केअर, एशियन ॲग्रीटेक्नोलॉजीस (इंडिया) प्रा. लि., बायस्टॅड इंडिया लि., गोदावरी ॲग्रो, वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजिस प्रा.लि., शक्तिमान, आयडियल ॲग्री सर्च या कंपन्या आहेत. प्रदर्शनात वितरित होणारी बक्षिसे सोनी गिफ्ट्स प्रा. लि. (नाशिक)द्वारे प्रायोजित आहेत.

Agrowon Grape Expo
Agrowon Grape Expo : शेतकरी, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने फुलले प्रदर्शन

प्रदर्शनात राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे माजी अतिरिक्त संचालक डॉ. सतीश भोंडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकारी डॉ. संतोष साबळे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, प्रगतिशील शेतकरी विष्णुपंत राहाटळ, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य कमलेश भोये आदींनी भेटी दिल्या.

सध्या द्राक्ष छाटणी हंगाम सुरू असल्याने छाटणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. मात्र हंगामी कामांमध्ये व्यस्त असतानाही शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. या शिवाय जिल्ह्यातील विविध प्रयोगशील द्राक्ष उत्पादक, द्राक्ष निर्यातदार यासह अनेकांनी भेटी दिल्या.

नाशिक जिल्ह्यासह धुळे, पुणे, नगर जिल्ह्यांतील द्राक्ष उत्पादकही प्रदर्शनाला भेट देत आहेत. द्राक्ष पीक विषयक विविध उपयुक्त माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी भेटी द्याव्यात व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com