River Pollution : पाताळगंगा नदीत दूषित पाणी

Contaminated Water : सह्याद्री पर्वतात उगम पावणारी पाताळगंगा नदी खोपोलीमार्गे गगनगिरी मठाला वळसा घालून खालापूर परिसरातून वाहते.
River Pollution
River Pollution Agrowon

Khalapur News : तालुक्याची जीवनदायिनी असलेली पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. विशेष म्‍हणजे, तालुक्यातील अनेक गावांतील पेयजल योजना नदीवर अवलंबून आहे. मात्र पाताळगंगा नदीपात्रात खोपोलीकरांचे सांडपाणी थेट सोडले जात आहे. त्‍यामुळे शेकडो घरात दूषित पाणी पोहोचत असल्‍याने रोगराई पसरण्याची भीती व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

सह्याद्री पर्वतात उगम पावणारी पाताळगंगा नदी खोपोलीमार्गे गगनगिरी मठाला वळसा घालून खालापूर परिसरातून वाहते. त्‍यानंतर आपटा गावाजवळ धरमतर खाडीला मिळते. खालापूर, पेण आणि पनवेल या तीन तालुक्याला समृद्ध करणारी पाताळगंगा नदीवर कारखानदारीमुळे रासायनिक अत्याचार होत आहेत. त्यात आता भर पडत आहे ती वाढती नागरी वस्तीची.

River Pollution
Panchganga River Pollution : नदी उशाला प्रदुषण घशाला, युवकांचे पंचगंगा नदीपात्रात उतरून आंदोलन

शहरातील सांडपाणी थेट पाताळगंगा नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे नदीपात्र प्रदूषित होत आहे. खोपोली फाटा येथील इंदिरा चौकातून आलेले मोठे गटार थेट पाताळगंगा नदीपात्राला जोडले गेले आहे. नागरी वस्तीतून येणारे अतिशय घाणेरडे, दुर्गंधीयुक्तपाणी सातत्याने नदी प्रवाहात मिसळत आहे. यात भर म्हणून या ठिकाणी नव्याने उभी राहत असलेल्या इमारतीमधील सांडपाण्याची विल्हेवाट करणारे पाईप नदीपात्रात सोडण्यात आले आहेत.

तसेच कारखान्यातील रासायनिक वाहतूक करणाऱ्या टँकरची थेट नदीपात्रात साफसफाई करण्यात येते. त्‍यामुळे नदीचे पात्र अधिकच प्रदूषित होत आहे. खोपोलीपासून पुढे आपटापर्यंत वाहत असलेल्या पाताळगंगा नदीच्या तीस-पस्तीस किलोमीटर परिघात येणारे अनेक गावांची पेयजल योजना या पाण्यावर अवलंबून आहे.

River Pollution
Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’ला प्रदूषणाचा विळखा

अनेक ग्रामपंचायतीकडे जलशुद्धीकरणाची सक्षम यंत्रणा नसल्याने दूषित पाण्याचा घोट येथील हजारो ग्रामस्थ घेत आहेत. त्‍यामुळे तालुक्‍यात रोगराई पसरण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. तसेच नदीचा आतापर्यंत सुरक्षित असलेला गगनगिरी मठाजवळील भागदेखील गेल्‍या काही दिवसांपासून प्रदूषित झाला आहे.

सांडपाणी विल्हेवाट होत असलेल्या ठिकाणी तपासणी करण्यात येईल. त्‍यावर योग्य ती उपाययोजना करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
- संदेश मेंगाळ, पाटबंधारे कनिष्ठ अभियंता
धार्मिक सण- उत्सवाच्या वेळी नदी प्रदूषित होते. म्हणून ओरड करणारे सामाजिक कार्यकर्ते अशावेळी मूग गिळून गप्प आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाठपुरावा करणार आहोत.
- दीपक पवार, दिलासा फाउंडेशन, पाताळगंगा बचाव उपक्रम प्रमुख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com