
सोलापूर : माळराने ही स्वतंत्र जैवविविधता (Biodiversity) लाभलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढविण्याबरोबरच गवत लागवड, मियावॉकीच्या (Miawaukee) माध्यमातून वन संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत.
वन्यजीवांच्या संरक्षणाबरोबरच माळढोकांच्या (Maldhok) कृत्रिम प्रजनानाचे आव्हान सध्या सोलापूर जिल्ह्यातील वन विभागासमोर आहे.
जागतिक वन दिनाच्या पार्श्वभूमीवर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, वन विभागाकडून सोलापूर जिल्ह्यातील जैवविविधता जपण्यासाठी खास प्रयत्न सुरू आहेत.
माळराने ही स्वतंत्र जैवविविधता असून सोलापूर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात आहे. या क्षेत्राचे संवर्धन होण्यासाठी वन विभागाच्या ताब्यातील कुरण जमिनीवर जंगली गवत लागवड सुरू आहे.
यामध्ये काळा धामण, शेडा, मारवेल, अंजन, डोंगरी या प्रजातींच्या गवाताची लागवड करण्यात येत आहे. गवताळ प्रदेशामुळे पर्यावरीणीय परिसंस्था सुरळीत राहते.
गवताच्या उपलब्धतेमुळे हरीण- काळविटपासून सर्व तृणभक्षक प्राण्यांच्या अन्नाचा प्रश्न सुटू शकतो. यामुळे माळढोक व तणमोर या पक्ष्यांचा अधिवास संरक्षित होऊ शकतो.
ठळक बाबी
जिल्ह्यात २५० हेक्टरवर गवत लागवड
वन्यजीवांनसाठी २० ठिकाणी सुरू होणार सोलरपंप
गवत लागवडीसाठी स्वतंत्र नर्सरी, बियांपासून तयार होतात गवताची रोपे
दर हेक्टरी दोन ते तीन महिने वयाच्या पाच हजार गवतरोपांची लागवड
नव्याने सुरू झालेल्या वन्यजीव उपचार केंद्रात एका काळविटासह पाच प्राण्यांवर उपचार
वृक्ष लागवडीबरोबरच मियॉवाकी, गवत लागवड यातून वनसंपदा वाढविण्यावर भर दिला जात आहे. वनवे रोखण्यासाठी वनविभाग व प्रसार माध्यमातून चांगली जनजागृती झाली आहे. यासाठी १९२६ ही स्वतंत्र हेल्प लाईन सुरू करण्यात आली आहे.
यामुळे आगीच्या घटना कमी झाल्या आहेत. कुठेही वनक्षेत्राला आग लागलेली आढळल्यास त्वरीत या हेल्प लाईन कळविण्यात यावे.
- धैर्यशील पाटील, उपवरसंरक्षक, सोलापूर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.