Biodiversity Conservation : जैवविविधतेचे संवर्धन आवश्‍यक

Prof. Siddharth Kadam : कोकणात जैवविविधता विपुल प्रमाणात आहे. या जैवविविधतेचे संवर्धन करावे, असे आवाहन पालघर संशोधन केंद्राचे प्रा. सिद्धार्थ कदम यांनी केले.
Biodiversity Training
Biodiversity TrainingAgrowon

Mumbai News : कोकणात जैवविविधता विपुल प्रमाणात आहे. या जैवविविधतेचे संवर्धन करावे, असे आवाहन पालघर संशोधन केंद्राचे प्रा. सिद्धार्थ कदम यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनस्पतीशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने कोसबाड हिल येथे स्थानिक वाण संवर्धन आणि जैवविविधता प्रशिक्षण झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Biodiversity Training
Biodiversity Conservation : जैवविविधतेची समृद्धी लाभलेली जहागीरदारवाडी-बारी

बदलत्या हवामानात स्थानिक वाण तग धरू शकतात. अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी ते महत्त्वाचे आहे. त्यांची निवड, संवर्धन, प्रसार आणि विक्री याबाबतीत सविस्तर माहिती डॉ. विलास जाधव यांनी दिली. डॉ. उदय पेठे यांनी स्थानिक वाणांचे गुणवैशिष्ट्ये आणि नोंदणीबाबत मार्गदर्शन केले.

Biodiversity Training
Conservation of Biodiversity : तब्बल १९ हजार झाडांची विविधता जपलेली गमेवाडी

डॉ. महेंद्र पालशेतकर यांनी स्थानिक वाण जतन करण्याच्या पद्धतीविषयी माहिती दिली. स्थानिक वाणांवरील कीड व रोग निर्मूलनासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात; याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. रमेश कुणकेरकर, विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता यांचे मार्गदर्शन मिळाले.

जुने ते सोने असा विचार केल्यास सुदृढ आरोग्यासाठी पुन्हा एकदा जुन्या गोष्टींकडे आपल्याला वळावे लागेल. देशातील ७४ टक्के जैवविविधता संपुष्टात आली आहे.ती पुनरुज्जीवित आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल.
रवींद्र पाचपुते, तालुका कृषी अधिकारी, डहाणू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com