Bee Pollination : परागीकरणासाठी मधमाश्‍यांचे संवर्धन...

Conservation of Bees : मध आणि त्यापासून तयार केलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत आहे. मधमाशीपालन करताना योग्य नियोजन केले, तर शेतीसाठी फायदा होईल तसेच व्यवसायातून उत्पन्न मिळू शकते.
Pollination
PollinationAgrowon
Published on
Updated on

डॉ. इंदिरा घोनमोडे, डॉ. रश्मिका कुंभार

Beekeeping Pollination Management : मध आणि त्यापासून तयार केलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत आहे. मधमाशीपालन करताना योग्य नियोजन केले, तर शेतीसाठी फायदा होईल तसेच व्यवसायातून उत्पन्न मिळू शकते. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सातेरी आणि युरोपियन मधमाशीपालन केले जाते. ७० ते ८० टक्के पिके परागीभवनासाठी मधमाशीवर अवलंबून आहेत. मधमाश्‍यांमुळे फळझाडे, भाजीपाला, कडधान्ये, तृणधान्ये तसेच तेलवर्गीय पिकांच्या उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ होते.

मधमाश्‍यांना वाचविण्यासाठी त्यांना त्यांचा अधिवास मिळवून दिला पाहिजे. त्यांच्या संवर्धनासाठी पारंपरिक पीक पद्धतीनुसार शेतातील पिकांचे वैविध्य वाढविले पाहिजे. स्थानिक हवामानानुसार वृक्ष लागवड, पिकांची निवड करणे आवश्यक आहे. नदीचे काठ, शेतीचे बांध, पडीक जागांवर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करायला हवी. मधमाश्‍यांना हानिकारक असणाऱ्या कीडनाशकांचा वापर कमीत कमी करायला हवा. शेताच्या बांधावर किमान एक मधमाशी पेटी ठेवून त्यांच्या संवर्धनासाठी हातभार लावणे शक्य आहे.

Pollination
Bee Pollination : परागीभवनात मधमाश्‍यांचा मोठा वाटा

युरोपियन मधमाशी (एपिस मेलिफेरा) 

ही मधमाशी आकाराने सातेरी माशीपेक्षा मोठी असते. या मधमाश्या कृत्रिम लाकडी मधुपेट्यांत पाळतात. जगभरात ही माशी मोठ्या प्रमाणात मध उत्पादनासाठी वापरली जाते. दर वर्षी प्रति वसाहत सरासरी २५ किलो मध उत्पादन मिळते. परागीभवनासाठी देखील मोठ्या प्रमाणात ही मधमाशी जगभरात वापरली जाते. हिचा स्वभाव मवाळ असल्याने जोपासना मोठ्या पद्धतीने केली जाते.

सातेरी मधमाशी (एपिस सेराना इंडिका) 

ही माशी आकारमानाने मध्यम असते. नैसर्गिक वातावरणात यांची पोळी झाडांच्या ढोलीत, खडकांतील भेगा, इमारतींच्या भिंतीतील आडोशाच्या जागा अशा आच्छादित ठिकाणी आढळतात. अंधाऱ्या जागेत ती कधी पाच तर कधी सात पोळी करून राहते. या मधमाश्या शांत, मवाळ व सहसा नांगी न मारणाऱ्या असतात. त्या सहज माणसाळत असल्यामुळे त्यांना कृत्रिम लाकडी मधुपेट्यांमध्ये पाळता येते. त्यांच्याद्वारे दर वर्षी प्रति वसाहत सरासरी ५ ते ६ किलो मध उत्पादन मिळते.

Pollination
Beekeeping Management : परागीकरणासाठी मधमाशी पेट्यांचे व्यवस्थापन

आग्या मधमाशी (एपिस डॉरसॅटा) 

भारतात आढळणाऱ्या मधमाश्‍यांमध्ये आकारमानाने ही सर्वांत मोठी आहे. ही मधमाशी डोंगरमाथ्यापासून उतरणीवर सर्वत्र आढळते. पोळे आकारमानाने खूप मोठे असते. पोळे उघड्यावर असून खडक, मोठ्या झाडाच्या फांद्यांना अथवा उंच इमारतीच्या छताला चिकटलेले असते. मधमाश्‍या अतिशय चिडखोर आणि नांगीने डंख मारणाऱ्या असतात. उघड्यावर राहण्याच्या आणि नांगी मारण्याच्या सवयीमुळे त्यांना कृत्रिम लाकडी मधुपेट्यांत पाळता येत नाही. मात्र त्यांचे योग्य संवर्धन केल्यास मोठ्या प्रमाणात परागीभवन आणि मधसंकलन करता येते.

फुलोरी मधमाशी (एपिस फ्लोरिया) 

भारतीय मधमाश्‍यामध्ये आकारमानाने सर्वांत लहान आहे. फुले फुलली की ही माशी आपले पोळे बांधते. फुलोरा संपला की उडून जाते. या मधमाश्‍या उघड्यावर पोळे बांधतात. पोळे तळहाताच्या आकारमानाचे असून ते मध्यम उंचीच्या झाडाच्या फांदीला बांधलेले असते. त्यांच्याद्वारे दर वर्षी प्रति वसाहत सरासरी ५०० ग्रॅम मध उत्पादन मिळते.

डंखरहित मधमाशी (त्रिगोना इरीडीपेन्नीस)

या माश्‍यांचा डंख पुरेसा विकसित झालेला नसतो. त्या परागीकरण चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्याद्वारे दर वर्षी ३०० ते ४०० ग्रॅम मध उत्पादन मिळते.

डॉ. इंदिरा घोनमोडे, ७२७६०६६६२७

(सहयोगी, सहायक प्राध्यापक, कृषी कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, कराड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com