Indian Congress : काँग्रेसची लढाई भाजपच्या सांप्रदायिकतेविरोधात

Communalism : काँग्रेस सामाजिक सद्‍भाव निर्माण करण्यासाठी पूर्वीही झटत होती आणि आजही झटत आहे.
BJP Congress
BJP CongressAgrowon

Gadchiroli News : काँग्रेस सामाजिक सद्‍भाव निर्माण करण्यासाठी पूर्वीही झटत होती आणि आजही झटत आहे. त्यामुळे आमची लढाई भाजपच्या सांप्रदायिकता, धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाविरोधात आहे. ही लढाई आणि आगामी निवडणुकाही महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्‍वास काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची विभागीय बैठक शनिवार (ता. २०) गडचिरोली येथील महाराजा लॉन येथे आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर चेन्नीथला यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्री. चेन्नीथला म्हणाले, की देशातील वाढती सांप्रदायिकता, धर्मांधता, अन्यायाविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा प्रारंभ केली आहे. आपण सर्वांनी त्यांच्या प्रयत्नांना बळ द्यायला हवे. भाजप सक्षम नसल्यानेच ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकते, इतर पक्षांतील आमदार, खासदार फोडून सत्ता मिळविण्यासाठी अनेक खटपटी करते.

BJP Congress
Congress leaders join BJP : नांदेडच्या राजकारणात भूकंप? माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर

त्याने देशाच्या विकासापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी निवडणुका महत्त्वाच्या असून, आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकांसाठी सज्ज झालो आहोत. आम्ही एकजुटीने या निवडणुका लढू व जिंकू. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात एक बैठक झाली आहे. दुसरी बैठक लवकरच पार पडेल, त्यानंतर जागा वाटप जाहीर करू, असेही ते म्हणाले.

BJP Congress
Congress question on Agriculture Budget : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेसचा हल्लाबोल

वंचित बहुजन आघाडीचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व शिवसेनेचे उद्धव ठाकरे चर्चा करत असून, त्यांची चर्चा आटोपल्यावर आम्हीही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सांप्रदायिकता, धार्मिक ध्रुवीकरण, महागाई, बेरोजगारी अशा मुद्यांवर आम्ही पूर्ण ताकदीने लढू व जिंकू, असेही ते म्हणाले. तसेच या वेळेस काँग्रेसचे उमेदवार लवकरात लवकर जाहीर करणार असल्याचेही म्हणाले.

फक्त ६ देशांमध्ये ईव्हीएम

जगात फक्त ६ देशांमध्ये ईव्हीएमचा वापर केला जातो, अन्य देश मतपत्रिकेचा वापर करतात, अशी माहिती देताना भारतातही मतदान पत्रिकेचा वापर व्हावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com