Congress leaders join BJP : नांदेडच्या राजकारणात भूकंप? माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर

Political Earthquake In Nanded: गेल्या वर्षभारात भाजपमध्ये अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. यात काँग्रेसमधून सोडून गेलेले नेते मंडळी आहेत. सहा महिन्यांपुर्वीच काँग्रेसमधून निलंबीत करण्यात आलेले आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Congress leaders join BJP : नांदेडच्या राजकारणात भूकंप? माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर
Published on
Updated on

Nanded News : गेल्या दोन एक वर्षात राज्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाली आहे. यादरम्यान भाजपमध्ये अनेक दिग्गजांनी प्रवेश केला आहे. त्यात काँग्रेसच्या नेत्यांचीही भर आहे. सहा महिन्यांपुर्वीच काँग्रेसमधून निलंबीत आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता काँग्रेससह नांदेडमध्ये राजकीय भूकंप होण्याची चर्चा रंगली आहे. यावेळी भाजपध्ये माजी मुख्यमंत्रीच प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा असताना अशोक चव्हाण यांचे नाव समोर येत आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये करतील असा दावा भाजप खासदाराने केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हा दावा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे. तसेच होणाऱ्या पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे.

Congress leaders join BJP : नांदेडच्या राजकारणात भूकंप? माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर
Ashok chavan : शून्य टक्के व्याजदराची पीककर्ज योजना संपुष्टात आणण्याचा डाव ; अशोक चव्हाण यांची टीका

दरम्यान चव्हाण यांच्या प्रवेशावर दावा करताना चिखलीकर यांनी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच तसे संकेत दिल्याचे म्हटलं आहे. तसेच बावनकुळे हे गुरुवारी (२१ रोजी) नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं होते. बावनकुळे यांनी वॉरियर्सची बैठकीत चव्हाण भाजपमध्ये प्रवेश येण्यास इच्छुक असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होतं आहेत.

Congress leaders join BJP : नांदेडच्या राजकारणात भूकंप? माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर
Ashok Chavan Latest News : अशोक चव्हाण यांच्याकडून नुकसानीची पाहणी

भाजपचा दुपट्टा

दरम्यान, चिखलीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून बावनकुळे यांनी सुचक प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. बावनकुळे म्हणाले, 'आम्ही पक्ष फोडायला जात नाही, कोणाला प्रवेश करा म्हणत नाही. पण कोण जर भाजपमध्ये प्रवेश करणार असेल, भाजपचा दुपट्टा घालणार असेल तर त्यांचे आम्ही स्वागतच करू, असे म्हटलं आहे.

दीडशे कोटी थकबाकी

दरम्यान खासदार चिखलीकर यांनी चव्हाण प्रवेशावर बोलताना म्हणाले, चव्हाण यांच्या साखर कारखावर दीडशे कोटी रुपयांचे थकबाकी हमी आहे. ती मागच्या सरकारने अद्याप माफ केलेली नाही. मात्र जेंव्हा त्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली लगेच ती माफ झाली. याचा अर्थ काय तो लक्षात येईल. अशोक चव्हाण हे सत्तेसाठी भाजपमध्ये येऊ शकतात. त्यांचे स्वागत आहे, असे असेही चिखलीकर यांनी म्हटलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com