Nana Patole : परभणीत हिंसाचार सरकार बेफिकीर; महायुतीत मंत्रीपदे व मलईदार खात्यांसाठी मारामारी, पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

Nana Patole on Parbhani violence : परभणीत बुधवारी (ता.११) भारतीय राज्यघटनेच्या विटंबनेवरून हिंसाचार भडकला. यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या.
Nana Patole on Parbhani violence
Nana Patole on Parbhani violenceAgrowon
Published on
Updated on

Pune News : परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना झाल्याचे घटना घडल्यानंतर येथे बुधवारी (ता. १२) हिंसाचार उसळला. यामुळे आंबेडकर अनुयायांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेचा महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध केला आहे. तसेच झालेला हा प्रकार आंबडेकर व संविधानाला मानणाऱ्या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तर शहरात कायदा आणि सुव्यस्था राखता न आलेल्या पोलीस अधिक्षकांचे यांना तात्काळ निलंबत करा अशी मागणी केली आहे.

यावेळी पटोले यांनी, परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करणारी घटना घडली. जी अत्यंत निषेधार्ह आहे. यानंतर येथे उसळलेला हिंसाचार महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर व संविधानाला मानणाऱ्या कोट्यवधी लोकांचा अपमान करणारा आहे. आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस येतेच कोठून असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. तर संविधानाची विटंबना करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन करा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Nana Patole on Parbhani violence
Bandh turns Violence in Parbhani : परभणीत बंदला हिंसक वळण! दुकानांची जाळपोळ, वाहनांची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक अन् लाठीचार्ज

पटोले पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना झाली. हा प्रकार चिंतानजक व महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालण्यास लावणारा आहे. अशा विकृतींवर कठोर कारवाई व्हायला हवी. तसेच शहरात पोलीसांनी आंबेडकर अनुयायांना अमानुष मारहाण केली. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, संचारबंदी लावली, इंटरनेट, एसटी सेवा बंद केली. पोलिसांना परिस्थिती व्यवस्थित हाताळता आली नाही. यामुळे याची चौकशी करून जिल्हा पोलीस अधिक्षक यांना तात्काळ निलंबत करा अशीही मागणी पटोले यांनी यावेळी केली आहे.

Nana Patole on Parbhani violence
Nana Patole : भाजप युतीला आता ‘लाडकी बहीण’ची गरज संपली, सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करतो; पटोलेंचा हल्लाबोल

तसेच पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे. परभणीत आगडोंब उसळत असताना राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री खातेवाडपाच्या बैठकीत व्यस्त होते. ते मलईदार खाती व मंत्रीपदे वाटून घेण्यात व्यस्त आहेत. या सरकारला राज्याचे काही देणेघेणे राहिलेलं नाही. संविधान न माननाऱ्या विचाराचे लोक सत्तेत असल्यानेच राज्यात असे प्रकार होत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

तर परभणीतील हिंसाचाराबद्दल नागपूरच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचा इशाराही पटोले यांनी दिला आहे. तसेच अशा घटना महाराष्ट्रात होणार नाहीत याची खबरदारी जनतेनं घ्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर लोकांनी अफवांना बळी न पडता लोकशाही मार्गाने या घटनेचा निषेध करावा, असेही आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com