APMC
APMCAgrowon

APMC News: कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीला ठोकलं कुलूप| अमरावतीत किसान सभेकडून निदर्शन| राज्यात काय घडलं?

६० वर्षांपूर्वी धाराशिवमधील कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापन झाली. पण अजूनही या बाजार समितीत व्यापारी खरेदीदार आणि शेतकऱ्यांना कसलीही सुविधा देण्यात आलेली नाही.
Published on

कृषी उत्पन्न बाजार समितीतला कुलूप ठोकलं

६० वर्षांपूर्वी धाराशिवमधील कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापन झाली. पण अजूनही या बाजार समितीत व्यापारी खरेदीदार आणि शेतकऱ्यांना कसलीही सुविधा देण्यात आलेली नाही. धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिवस कधी बदलणार? असा प्रश्न उपस्थित करत कॉँग्रेस पदाधिकारी उमेश राजेनिंबाळकर यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला गुरुवारी (ता.१४) कुलूप ठोकून आंदोलन केलं. १९५९ साली कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापन झाली. मात्र अजून बाजार समितीत कामाच्या विभागणी व्यवस्थित करण्यात आलेली नाही. यावेळी हातात फलक घेऊन कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. 

किसान सभेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन

राष्ट्रव्यापी किसान महापंचायतला पाठिंबा देत अमरावती जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता.१४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. गुरुवारी देशभरातील शेतकरी आणि शेतमजूर संघटनांनी दिल्लीत निदर्शनं केली. संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चानं हमीभावा कायद्यासह विविध मागण्यांसाठी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाला किसान सभेनेही पाठिंबा दिलेला आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेने हमीभाव कायदासोबतच सर्वंकष पीक विमा योजना, वीज बिल कायदा २०२२ मागे घ्या आणि भूसंपादन २०१३ चा कायदा जैसे थे ठेवा अशा मागण्या करत सरकारचा निषेध व्यक्त केला. 

APMC
Sugar Production : यंदा देशभरात साखरेचे उत्पादन वाढणार, इस्माकडून अंदाजे आकडेवारी जाहीर

विमा कंपनी प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांची लूट

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पीक विमा मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीक विमा मंजूरीसाठी पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनीच शेतकऱ्यांकडून पैसे उकाळायला सुरूवात केलीय. दोन आठवड्यापूर्वी भोकरदन तालुक्यात मोठ्याप्रमाणात गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांची माती झाली. या गारपीटीनंतर पीक विमा प्रतिनिधींनी गावोगावी जाऊन विमा मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी सुरू केली. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी ३०० रुपये विमा प्रतिनिधींना देऊ केले. त्यामुळे शेतकऱ्यांची विमा कंपन्याच लूट करत असल्याचे प्रकार घडतायत.

तालुक्यातील नुकसानीच्या सूचना ऑनलाइन केलेल्या शेतकऱ्यांची नावं यादीत आलेली आहेत. अशा शेतकऱ्यांकडून कागदपत्र गोळा करण्याचं निमित्त करून विमा कंपनीचे प्रतिनिधी गावात जातात. शेतकऱ्यांना भेटतात आणि त्यांना विमा मिळवून देण्याचं आश्वासन देतात. आणि शेतकऱ्यांकडून ३०० रुपयांपर्यंतची मागणी करतात. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, लोहा, पारध बू, पद्मावती, वालसावंगी या तालुक्यात विमा प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना लुटल्याचं प्रकार घडले आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यात पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com