Jaljeevan Mission : वावी येथील जलजीवनच्या कामांचा सावळागोंधळ उघड

Jaljeevan Mission Update : सिन्नर तालुक्यातील वावी येथे जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेले जलवाहिन्या टाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
Jaljeevan Mission Work
Jaljeevan Mission WorkAgrowon
Published on
Updated on

Nashik News : सिन्नर तालुक्यातील वावी येथे जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेले जलवाहिन्या टाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची सखोल चौकशी करावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मात्र त्यांनतर चौकशीच्या भीतीने ठेकेदाराचे धाबे दणाणले आहे. जलवाहिन्या टाकण्याच्या कामात झालेला सावळागोंधळ दडपण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून करण्यात येत असून ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या तक्रारींची वस्तुस्थितीदेखील समोर आली आहे.

वावी ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांचा आराखडा व अंदाजपत्रक वारंवार मागणी करूनदेखील ग्रामस्थांना देण्यात येत नव्हते. अधिकारी व ठेकेदार एकमेकांकडे बोट दाखवत होते. तर ग्रामपंचायत प्रशासनदेखील या कामाबाबत ठेकेदार व अधिकारीच माहिती देतील, असे सांगत होते.

Jaljeevan Mission Work
Jaljeevan Mission : ग्रामस्थांना दरडोई ५५ लीटर पाणी मिळावे

सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी खळवाडी, गायत्री नगर, घोटेवाडी रस्त्याच्या बाजूने प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत टाकण्यात आलेल्या वाहिनींची कामे निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर ठेकेदाराची झोप उडाली.

गेले दोन महिने परागंदा असणाऱ्या ठेकेदाराचे पथक वावीमध्ये दाखल झाले असून त्यांच्याकडून अर्धवट खोदकाम करून गडण्यात आलेले पाइप नव्याने टाकले जात आहेत. काही ठिकाणी उघड्यावर जमिनीशी समांतर पाइप टाकले आहेत. त्यावर काँक्रिटचा थर देऊन लबाडी लपवण्याचादेखील प्रयत्न सुरू आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत चौकशी केल्याखेरीज अशा पद्धतीने ठेकेदाराला अभय देण्यात येऊ नये, असे सांगितले.

Jaljeevan Mission Work
Jaljeevan Mission : ‘जलजीवन’साठी पूर्णवेळ अधिकाऱ्यांची वानवा

मात्र त्याकडे दुर्लक्ष करत अधिकाऱ्यांच्या संगनमताने कामातील झोल लपवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर टाकण्यात आलेली जलवाहिनी जागोजागी पुन्हा उकरण्यात आली असून ती निर्धारित खोलीपर्यंत टाकण्यासाठी ठेकेदाराची लगबग सुरू आहे. मात्र हा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशी होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला जुन्या कामाची दुरुस्ती अथवा नवीन काम करू देणार नाही. अधिकाऱ्यांना याबाबत सांगूनही हा प्रकार सुरू राहिला तर ग्रामस्थ टोकाची भूमिका घेतील. योजनेच्या निकृष्ट कामांची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी आमची मागणी आहे. कामाची गुणवत्ता गावातील सर्व जनतेला माहिती आहे. ठेकेदाराला प्रशासन पाठीशी घालणार असेल तर आंदोलन करावे लागेल.
गणेश वेलजाळी, तक्रारकर्ते, ग्रामस्थ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com