Jaljeevan Mission : ग्रामस्थांना दरडोई ५५ लीटर पाणी मिळावे

ZP Water and Sanitation Department : ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई ५५ लीटर पाणी उपलब्ध झाले पाहिजे, हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
Jaljeevan Mission
Jaljeevan MissionAgrowon

Jalgaon News : ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई ५५ लीटर पाणी उपलब्ध झाले पाहिजे, हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमात प्रत्येक गावातील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक जलस्रोतांची १०० टक्के पाणी गुणवत्ता तपासणी करून ग्रामस्थांना स्वच्छ सुरक्षित पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे, असा सूर जिल्हा परिषदेत पाणी व स्वच्छता विभागातर्फे आयोजित गुणवत्ता प्रशिक्षणावेळी मान्यवरांच्या मनोगतातून व्यक्त झाला.

केंद्रातर्फे जलजीवन मिशन राबविले जात आहे. त्या अंतर्गत गुणवत्तापूर्वक पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळावे यासाठी पाणी व स्वच्छता विभागातर्फे पाणी गुणवत्ता प्रशिक्षणपर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

Jaljeevan Mission
Jaljeevan Mission : ‘जलजीवन’साठी पूर्णवेळ अधिकाऱ्यांची वानवा

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात झालेल्या चर्चासत्राला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. लोखंडे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, प्रकल्प संचालक भरत कोसोदे, कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जयवंत मोरे आदी उपस्थित होते.

द्वितीय सत्रात पाणी गुणवत्ता संनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील पीडब्ल्यू एक्स स्रोत तपासणी, शाळा, अंगणवाडी घरगुती नळजोडणी, पाणी गुणवत्ता तपासणीबाबत चर्चा होऊन पाणी नमुने संकलित करतानाच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.

Jaljeevan Mission
Jaljeevan Mission : ‘जलजीवन मिशनची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण करा’

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे रासायनिक व जैविक तपासणी तसेच रासायनिक जैविक घटकासाठी आढळलेल्या पाणी स्त्रोतांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रशिक्षणार्थींशी चर्चा करण्यात आली.

दूषित स्त्रोतांवर तत्काळ कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुख्य प्रशिक्षक म्हणून धुळे येथील पाणी गुणवत्ता सल्लागार विजय हेलिंगराव, केमिस्ट आशा पाटील, बॅक्टेरिऑलॉजिस्ट हर्षल वाघोदे यांनी मार्गदर्शन केले.

प्रकल्प संचालक भरत कोसोदे यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, उप अभियंता, विस्तार अधिकारी (ग्रा.पं.), विस्तार अधिकारी (आरोग्य), जिल्हा तज्ञ, सल्लागार आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com