Computerization of Societies
Computerization of Societies Agrowon

Development Service Society : नाशिक जिल्ह्यातील ६१४ विकास सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण

Computerization of Societies : पहिल्या टप्प्यात राज्यभरातील सुमारे १५ हजार सोसायट्यांचे संगणकीकरण होणार आहे.

Nashik News : केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने देशातील विकास सेवा सोसायट्या संगणकीकरण करण्याचे काम होती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यभरातील सुमारे १५ हजार सोसायट्यांचे संगणकीकरण होणार आहे.

यामध्ये जिल्ह्यातील ६१४ संस्थांचा समावेश आहे. संगणकीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली असून १५ संस्थांचे काम पूर्ण झाल्याने त्यांचे कामकाज सुरू झाले आहे. १५५ संस्थांचे सॉफ्टवेअर बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या ग्रामीण भागातील विकासाची आर्थिक नाडी असून त्यांना बळकटी मिळावी तसेच ठेवीदार व सभासदांना संस्थेची माहिती एका क्षणात मिळावी, व्यवहार पारदर्शी व्हावेत,

भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेमधून संगणकीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत संस्थांचे व्यवहार पूर्णपणे संगणकीकृत केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यात एजन्सी नेमण्यात आल्या आहेत.

Computerization of Societies
Crop Insurance : पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक| शंभू सीमेवरील आंदोलन दोन दिवस स्थगित| राज्यात काय घडलं?

या ठेवीदार व सभासदांना योजनेसाठी सोसायट्यांची माहिती संकलित करून ती सरकारला पाठवण्यात आली होती. त्यानंतर सरकारने ज्या संस्थांची माहिती परिपूर्ण आहे. त्या संस्थांना संगणक आणि प्रिंटर दिले आहेत.

केंद्र सरकार सुमारे ४ लाखांचे साहित्य संस्थांना देणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील १,०५१ पैकी ६१४ संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यातील १५५ सोसायट्यांना संगणक, प्रिंटर व इतर साहित्य पुरविण्यात आले आहे.

Computerization of Societies
Mahanand Dairy : कांदा निर्यात बंदी आणि महानंदवरून रोहित पवार यांची सरकारवर टीकेची झोड

१५ संस्थांना सॉफ्टवेअर देखील दिले गेले असून त्या संस्थांची माहिती त्या सॉफ्टवेअरमध्ये भरली गेली आहे. त्यामुळे या संस्था आता ऑनलाइन होणार आहेत. संगणकीकृत झाल्यानंतर या संस्थांच्या कारभारात सुसूत्रता येणार आहे.

तालुका आणि (कंसात) संगणीकरण होणाऱ्या संस्थांची संख्या)

सटाणा (१४), चांदवड (७८), देवळा (२२), दिंडोरी (३९), इगतपुरी (१०), कळवण (१९), मालेगाव (५२), नांदगाव (३९), नाशिक (६४), निफाड (११२), सिन्नर (६७), सुरगाणा (१), त्र्यंबकेश्वर(६), येवला (७९).

ग्रामीण भागातील सहकारी संस्था शेतकरी व शेती व्यवसायाशी ८८ निगडित आहेत. त्यांचा कारभार आतापर्यंत ऑफलाइन होता. आता त्या ऑनलाइन करण्यासाठी केंद्र सरकारकडून संगणक, नेट सुविधा दिल्या जाणार आहेत. ज्या संस्थांकडे आर्थिक भांडवल आहे, त्यांना आता पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, कार्गो व्हॅनसारखे व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात येईल.
फयाज मुलाणी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com