Compost Plant : अंबरनाथच्या कंपोस्ट खत प्रकल्पाची दयनीय अवस्था

Organic Fertilizer : केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत शहरात विलगीकरण केलेल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले होते.
Organic Fertilizer
Compost PlantAgrowon
Published on
Updated on

Navi Mumbai News : स्वच्छ सर्वेक्षण योजनेंतर्गत तीन ते चार वर्षांपूर्वी अंबरनाथ नगरपालिकेने ठिकठिकाणी लहान प्रमाणात कंपोस्ट खत प्रकल्पांची निर्मिती केली होती; मात्र याची योग्य निगा व देखभाल न केल्याने दुरवस्था झाली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमांतर्गत शहरात विलगीकरण केलेल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले होते. काही प्रमाणात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प राबवला होता.

Organic Fertilizer
Compost Making : टाकऊ ऊस पाचटापासून लवकर कुजणार कंपोस्ट कसं बनवाल?

त्यानुसार शहरात पूर्व आणि पश्चिमेला १० ठिकाणी २०१९ मध्ये रस्त्याच्या बाजूला, कुणाला अडथळा होणार नाही. साचवलेल्या कचऱ्यापासून दुर्गंधीचा त्रास होऊ नये, याची खबरदारी घेत प्रकल्प तयार केले होते.

या ठिकाणी टाकलेल्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करून ते पालिकेच्या इमारतींमधील झाडांना टाकायचे, असे ठरले होते. तथापि भाजी मार्केटमध्ये जमा होणाऱ्या ओल्या भाज्या, कचऱ्यापासून खतनिर्मिती होत असल्याचे प्रशासनाने सांगण्यात येते.

Organic Fertilizer
Agriculture Compost Method : पाचट कुजविण्याच्या पद्धती

वडवली वेल्फेअर सेंटर आणि शिवमंदिरजवळील फुले, निर्माल्य जमा होते. ते निर्माल्य कंपोस्ट खतनिर्मिती केंद्रात येणे आवश्यक असतानाही तिथे प्रकल्पाची दुरवस्था झाली आहे.

कंपोस्ट खत केंद्रे सुरू करणार

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत मानांकन मिळवण्यासाठी शिवाजीनगर परिसरात पूर्वेला यूपीएस्सी सेंटर येथे १० टन आणि पश्चिमेला सर्कस ग्राउंड येथे १५ टन अशी २५ टन क्षमतेची कंपोस्ट खत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

पालिकेने २०१९ मध्ये १० जागी खत प्रकल्प सुरू केले होते. सहा महिन्यांनी तयार झालेल्या खतांचा वापर उद्यानातील झाडांसाठी केला जातो. प्रकल्पाची देखभाल नियमित केली जाईल.
- उमेश राऊत, उपमुख्याधिकारी, अंबरनाथ, नगरपालिका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com