Crop Damage Compensation : काहींना नुकसान भरपाईचे वाटप तर अनेकांना अजूनही प्रतीक्षाच

Heavy Rain Crop Loss : दसरा-दिवाळीतही निधीचे वाटप होऊ शकले नाही. म्हणून निवडणुकीच्या तोंडावर तरी वाटप होणार का, असा सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Latur News : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची दखल घेत सरकारने नुकसान भरपाई म्हणून ३८४ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी मंजूर करून महिना उलटला तरी अद्याप जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.

विशेष म्हणजे दसरा-दिवाळीतही निधीचे वाटप होऊ शकले नाही. म्हणून निवडणुकीच्या तोंडावर तरी वाटप होणार का, असा सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage Compensation : नांदेडला नुकसानग्रस्तांचे ८१२ कोटी अडकले आचारसंहितेत

याची दखल घेऊन सरकारने लातूर जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५८ हजार ७६७ शेतकऱ्यांना ३८४ कोटी १४ लाख ३८ हजार रुपये अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला. निधीही मंजूर केला. याबाबतचा अध्यादेश ४ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी करण्यात आला. दसरा, दिवाळीत ही मदत मिळेल, अशी शक्यता होती. त्यानुसार काही शेतकऱ्यांना मदत मिळाली. तर, बहुतांश शेतकरी अजूनही निधीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

Crop Damage
Land Compensation : जमीन गेली, धड नोकरीही नाही

लातूरमधील २७ हजार ४३१, औसा येथील ३२ हजार ८६४, रेणापूरमधील ४४ हजार २३५, निलंगा येथील १६ हजार ५२४, शिरूर अनंतपाळ येथील २५ हजार १८, देवणी येथील २८ हजार ३१५, उदगीर ५७ हजार १, जळकोट येथील २१ हजार ५८२, अहमदपूर येथील ५७ हजार ४०४, चाकूरमधील ४८ हजार ३९३ शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे. यातील अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी करूनही देखील त्यांना निधी मिळाला नाही, असे दिसून येत आहे.

लातूर तालुका सर्वांत पुढे

सप्टेंबर २०२४ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर करण्यात आलेल्या तालुकानिहाय निधीच्या वाटपात लातूर तालुका सर्वांत पुढे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्यांना निधी मिळाला नाही, त्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com