Pune Water Shortage : पुणेकरांच्या चिंतेत भर!; घटणारा पाणीसाठा अन् नीरा धरणाच्या उजव्या कालव्याला गळती

Niradevghar Dam : भोर तालुक्यातील नीरादेवघर धरणाच्या उजवा कालव्याला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच हे पाणी शेतात साचून राहील्याने शेती नापिक होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
Pune Water Shortage
Pune Water ShortageAgrowon

Pune News : यंदा पुण्यासह राज्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे राज्य शासनाकडून पाणीबचतीसह तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तर पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई पाहता अनधिकृत सर्व्हिसिंग सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गरज पडल्यास जिल्ह्यात सुरू असणारी बांधकामे देखील बंद करावीत, असे म्हटले होते. यादरम्यान भोर तालुक्यात नीरादेवघर धरणाच्या उजवा कालव्याला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच हे पाणी शेतात साचून राहील्याने शेती नापिक होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

धरणातील उपयुक्त पाणीसाठा

पुण्यासह राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. याचा थेट फटका धरणातील पाणीसाठ्यावर होत असून उपयुक्त पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. जलसिंचन विभागाच्या आजच्या माहितीनुसार पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडवासला, वरसगाव, पानशेत, पवना आणि टेमघर धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा कमी होत आहे. सोमवारी (ता.१५) या धरणांमध्ये अनुक्रमे ५४.९५ टक्के, ४०.२७ टक्के, ३४.५० टक्के, ३४.९० टक्के आणि ७.९६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. यामुळे किमान पावसाळा सुरू होऊ पर्यंत या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे.

Pune Water Shortage
Water shortage : पाणी, चारा टंचाईवर मात करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून टंचाई नियंत्रण कक्ष सुरू 

जिल्ह्यात २०९३ टँकरेने पाणीपुरवठा

यासोबतच जिल्ह्यातील गावागावातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी टँकर फिरवले जात आहेत. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या शुक्रवार (ता.१२) च्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील ८९ गावे आणि ५७७ वाड्यावस्त्यांना ११६ टँकरेने पाणीपुरवठा केला जात आहे.

नीरादेवघर उजवा कालव्याला गळती

सध्या जिल्ह्यात अशी स्थिती असतानाच भोर तालुक्यात नीरादेवघर धरणाच्या उजवा कालव्याला गळती लागली आहे. यामुळे कालव्या लगत असणाऱ्या शेतीत पाणी शिरल्याने शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

तसेच कालव्याचे अस्तरीकरण करून ही गळती रोखावी, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे कंकवाडी, चिखलावडे, आंबेघर, सांगवी, भावेखल, नाटंबी, शिरवली, साळव, अंगसुळे, करंजे, या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र या मागणीकडे आणि कालव्याच्या गळतीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असून भोर तालुक्यात पाणी टंचाईचे संकट येण्याची शक्यता आहे.

Pune Water Shortage
Water Shortage : धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचा भाजीपाला पिकांना फटका

जमीन नापिक होण्याचा धोका

भोर तालुक्यात नीरादेवघर धरण ११.९१ टीएमसी पाणीसाठ्याचे असून सध्या या धरणात उपयुक्त पाणीसाठा ३७.२४ टक्के आहे. तर मागील वर्षी याच दिवशी येथे ४०.२२ टक्के पाणीसाठा होता. मात्र आता उजव्या कालव्यात पाणी सोडले जात असताना गळती लागल्याने कालव्या शेजारील १० गावांमधील शेत जमीन पाणी साठले आहे. यामुळे जमीन नापिक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

खरीप हंगामावर परिणाम

सध्या अनेक ठिकाणी खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी मशागती केल्या जात आहेत. मात्र नीरादेवघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या गळतीमुळे सुमारे १० गावातील मशागतीचे काम रखडले आहे. यामुळे खरिपाच्या पिकांवर होण्याची चिन्हे असून फक्त पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे आंबेघर सह इतर गावातील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com