CM medical Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता निधीतून रुग्णांना मदत

Medical Help : गेल्या सात महिन्यांचा (जानेवारीपासून) विचार करता ५८७ रुग्णांना ४ कोटी ८९ लाख ९३ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे.
CM Medical Fund
CM Medical FundAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते. यंदा जून महिन्यात सर्वाधिक ३२० रुग्णांना या योजनेतून मदत दिली आहे. गेल्या सात महिन्यांचा (जानेवारीपासून) विचार करता ५८७ रुग्णांना ४ कोटी ८९ लाख ९३ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात असून आर्थिक मदतीचा हात दिला जातो. मुख्यमंत्री वैद्यकीय साह्यता निधीतून कर्करोग, हृदयविकार, मेंदूविकार, नवजात बालकांचे गंभीर आजार, मूत्रपिंड व लिव्हर प्रत्यारोपण, अपघातातील शस्त्रक्रिया, महागड्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अशा गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी मदत दिली जाते.

CM Medical Fund
Shiv Sena Medical Help Desk : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्रयत्न

याशिवाय, मदत न मिळाल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यासारख्या पर्यायी योजनांची माहितीही रुग्णांना देण्यात येते. अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात दाखल अर्जांची तातडीने पडताळणी करून ते मुंबईकडे पाठवले जातात.

या निधीतून गेल्या सात महिन्यांत ५८७ रुग्णांना ४ कोटी ८९ लाख ९३ हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले आहे. त्यात जानेवारीत ३२ अर्जांना २४ लाख ६५ हजार, फेब्रुवारीत २८ अर्जांना २२ लाख ७५ हजार, मार्चमध्ये ४३ अर्जांना ३२ लाख २५ हजार, एप्रिलमध्ये २९ अर्जांना २४ लाख ७० हजार, मेमध्ये ३२ अर्जांना २४ लाख ६५ हजार, जूनमध्ये ३२० अर्जांना २ कोटी ७३ लाख ६३ हजार आणि जुलैच्या १३ तारखेपर्यंत १०३ अर्जांना ८७ लाख ३० हजारांचे आर्थिक साहाय्य दिले.

CM Medical Fund
Medical Facility In School : शाळांत वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवा

सध्या जिल्ह्यातील १०५ नोंदणीकृत रुग्णालयांमधून हा निधी मिळवता येतो. कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी कार्यरत असून नागरिकांनी येथे संपर्क साधावा, असे आवाहन कक्षाचे प्रमुख डॉ. नीळकंठ ठाकरे यांनी केले आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

रुग्ण दवाखान्यात भरती झाल्यानंतर दोन दिवसांत अर्ज दाखल केल्यास, कागदपत्रे पूर्ण असल्यास पाच दिवसांतच निधी संबंधित रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो. अर्ज करताना अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्याचा स्थाननिश्‍चित (जिओ टॅग) केलेले छायाचित्रे, उपचार खर्चाचे अंदाजपत्रक (खासगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र आवश्यक), तहसीलदार यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (१ लाख ६० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे), आधार कार्ड, आजाराशी संबंधित निदानात्मक कागदपत्रे, तसेच अपघातग्रस्त रुग्णासाठी पोलिसांचा एफआयआर, प्रत्यारोपणाच्या बाबतीत विभागीय समितीचा अहवाल अशी कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहेत. अर्ज कक्षात थेट जमा करावीत किंवा ई-मेलद्वारे (aao.cmrf-mh@gov.in) पाठवावीत. अर्ज केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकाच्या साह्याने https://cmrf.maharashtra.gov.in/applicantEnquiryForm.action या संकेतस्थळावर अर्जाची सद्यःस्थिती तपासता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com