Medical Facility In School : शाळांत वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवा

Education Department : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान सहा ते सात तास विद्यार्थी उपस्थित असतात.
Health Check up
Health Check up Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान सहा ते सात तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते.

हे पाहता शाळांनी वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे वेळोवेळी त्याचा आढावासुद्धा घेतला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी सहकाऱ्यांनी त्याबाबतीत नेहमी सजग असणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.

Health Check up
Education Right Policy : शिक्षण हक्क धोरणात करावा लागेल बदल

यानुसार शाळांना प्रथमोपचाराकरिता आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. संचालक, उपसंचालकांनी मासिक आढावा आवश्यकतेनुसार शिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावे लागणार आहे.

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी आठ आठवड्यांच्या आत शासनास कार्यपूर्तता अहवाल सादर करावा तसेच प्रतिवर्षी जानेवारी ते जुलैमध्ये याबाबतच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन शासनास एकत्रित अहवाल सादर करावा, अशी सूचना अव्वर सचिव प्रवीण मुंढे यांनी दिल्या आहेत.

Health Check up
Educational System : शाश्वत विकासाचा शिक्षणमार्ग

उपाययोजनांबाबत सूचना

शाळेत आवश्यकतेनुसार प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात. वर्षात एकदा वैद्यकीय तपासणी शिबिर घ्यावे. तातडीचे प्रथमोपचार देण्याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावावेत.

विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास वाहन असावे. विद्यार्थ्यांकरिता तणावमुक्तीसाठी कार्यशाळा घ्यावी. विद्यार्थ्यांना समूपदेशकाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमण्यात यावेत, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com