Shiv Sena Medical Help Desk : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्रयत्न

Shrikant Shinde : स्व. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने केडगाव येथे कामगारांसाठी सर्वरोग निदान शिबिर झाले.
Shiv Sena Medical Help
Shiv Sena Medical HelpAgrowon
Published on
Updated on

Nagar Shivsena News : सर्वसामान्य, गरजूंना आरोग्यसेवा मोफत मिळावी, त्यांच्यावर मोफत उपचार व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री साह्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले.

Shiv Sena Medical Help
Shiv Sena on SC Decision : ठाकरे गटाची पुन्हा झिरवाळांच्या दालनात धाव ; 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याची मागणी

स्व. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने केडगाव येथे कामगारांसाठी सर्वरोग निदान शिबिर झाले.

मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे प्रमख मंगेश चिवटे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, हरप्रमुख दिलीप सातपुते, वैद्यकीय कक्ष संपर्क प्रमुख रणजित परदेशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीतून तयार झालेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामुळे अनेक गरजू, सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. अचानक उद्‍भविलेल्या हॉस्पिटलच्या खर्चाची जुळवणी कशी करायची, हा प्रश्‍न या योजनेमुळे सुटला आहे.

सर्वसामान्य, गरजूंना आरोग्यसेवा मोफत मिळावी, त्यांच्यावर मोफत उपचार व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com