Farm Road : शेत पाणंद रस्त्यांच्या अनुदानात वाढ ; १ किमी रस्त्यासाठी मिळणार ९ लाख रुपये

Farm road scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेत पाणंद रस्ते बांधण्यासाठी अनुदानमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेण्यात आला आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.
Farm road
Farm road agrowon
Published on
Updated on

shet panand road scheme : राज्यातील गावागावात शेतरस्ते, पाणंदरस्ते तयार करण्यासाठी मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ’ योजनेतून १ किमी रस्त्यासाठी आता ९ लाख रुपयांपर्यत अनुदान देण्यात आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.

गाव आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतरस्ते खूप महत्वाचे असतात. पाणंद रस्ते नसल्यास शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या शेतमालाच्या वाहतूकीला मर्यादा येतात. शेतमाल बाजारात घेऊन जाता येत नसल्याने शेतकऱ्याला फायद्याचे पीकही घेत नाही. यासाठी राज्य शासनाकडून “मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि “गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे.

Farm road
Rural Road Issue : पाणंद रस्त्यांच्या कामांना ‘ब्रेक’

राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून राज्यात पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना राबवण्यात येत होती. ही योजना राबवताना येणाऱ्या अडचणी दूर करून या योजनेतील कामांसाठी मनरेगामधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेचे नामकरण ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’असे करण्यात आले.

या योजनेंतर्ग पूर्वी पाणंद रस्त्यासाठी १ किमी रस्त्यासाठी १ लाख रुपये अनुदान शासनाकडून मिळत होते. पण आता शेत रस्ता तयार करण्यासाठी तब्बल ९ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणारे आहे. त्यामुळे शेत/पाणंद कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे अशी कामे घेता येणार आहे. अशा रस्त्यांमुळे शेती विकासालाही चालना मिळू शकेल, असे मंत्री भुमरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com