National Agri Market: राष्ट्रीय बाजारासाठी मुख्यमंत्री सकारात्मक

Maharashtra APMC Reform: राज्यात पुण्यासह पाच बाजारसमित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. तसेच महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजारासाठी दाबचेरी (जि. पालघर) येथे दोन हजार एकर जागेची चाचपणी करा, अशा सुचनाही त्यांनी पणन विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात पुण्यासह पाच बाजारसमित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. तसेच महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजारासाठी दाबचेरी (जि. पालघर) येथे दोन हजार एकर जागेची चाचपणी करा, अशा सुचनाही त्यांनी पणन विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १४) झालेल्या बैठकीत पणनमंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील प्रस्तावित पणन सुधारणांविषयीचे सविस्तर सादरीकरण केले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव, राज्याचे पणन संचालक विकास रसाळ, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

CM Devendra Fadnavis
APMC National Status: राज्यातील बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा देण्यासाठी हालचाली

राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूर, लातूर, नागपूर बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा तर मुंबई बाजार समितीला आंतरराष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याच अनुषंगाने झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव आणि बाजार समित्यांच्या सक्षमीकरणाचे प्रस्ताव तातडीने सादर करा, त्यावर कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिले.

CM Devendra Fadnavis
Pune APMC Scam: पुणे बाजार समितीचा गैरव्यवहार विधान परिषदेत गाजला

केंद्र शासनाने २०१७ मध्ये मॉडेल ॲक्टचा मसुदा सर्व राज्यांना दिला. त्यामध्ये ‘एक देश एक बाजार’ या संकल्पनेवर विविध सुधारणा सुचविल्या होत्या. मात्र त्या अद्याप अंमलात आलेल्या नाहीत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पणन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदलांसाठी १०० दिवसांच्‍या कृती कार्यक्रमातदेखील मुंबईला आंतरराष्ट्रीय बाजार उभारण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजारासाठी दोन हजार एकर जागेच्या उपलब्धतेची चाचपणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कारभार प्रशासकीय मंडळाकडे?

दरम्‍यान, पणन सुधारणांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आर्थिक सत्ताकारणाचे केंद्र असलेल्या मोठ्या बाजार समित्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. त्यानुसार बाजार समित्यांचा कारभार निवडून आलेल्या संचालक मंडळाऐवजी सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकीय मंडळाकडे सोपविला जाण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com