Crop Harvesting : पीक कापणीच्या काळात ढगाळ वातावरण

पावसाळी वातावरणात काढणी व वाहतुकीला अडथळे येतील. यामुळे शेतकरी काढणी करून घेत आहेत.
Cloudy Weather
Cloudy WeatherAgrowon

Jalgaon News : खानदेशात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy weather) आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. ऐन कापणी, काढणी (Crop Harvesting), मळणीच्या वेळेस वातावरण प्रतिकूल झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

सध्या सर्वत्र हरभरा कापणी (Chana Harvesting), मळणीचे काम सुरू आहे. कोरडवाहू दादर ज्वारी (Dry Land Dadar Jowar) मळणीवर आली आहे. तसेच गहूदेखील अनेक भागात मळणीवर आहे.

पपईची काढणी (Papaya Harvesting) अंतम टप्प्यात आहे. अशातच ढगाळ वातावरण तायर झाले आहे. पाऊस आल्यास मोठी पिकहानी होईल. हातातोंडाशी आलेला हंगाम वाया जाईल, अशी भीतीदेखील आहे.

Cloudy Weather
Wheat Harvesting : पुणे जिल्ह्यात गहू काढणी सुरू

हरभऱ्याची सर्वाधिक सुमारे सव्वादोन लाख हेक्टरवर खानदेशात पेरणी झाली होती. कमाल क्षेत्रातील हरभऱ्याची मळणी पूर्ण झाली आहे.

उशिरा पेरणीच्या हरभऱ्याची कापणी, मळणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांना हरभरा शेतात कापून ठेवला आहे. दोन दिवसांत गोळा करून त्याची मळणी करण्याचे नियोजनही शेतकऱ्यांचे आहे.

दादर ज्वारी मळणीवर आहे. दाणे पक्व झाल्याने अनेक भागांत वाऱ्यामुळे दादर आडवी झाली आहे. त्यावर पाऊस आल्यास मोठी नासाडी होईल. दादर ज्वारीची कापणी शेतकऱ्यांनी अद्याप टाळली आहे. कारण पाऊस आल्यास मोठे नुकसान होईल.

पपईची काढणी शेतकरी करून घेत आहेत. पावसाळी वातावरणात काढणी व वाहतुकीला अडथळे येतील. यामुळे शेतकरी काढणी करून घेत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या पपईची फळे काढणीसाठी येण्यास दोन ते तीन दिवस लागतील, अशात पाऊस आल्यास नुकसानीचा अंदाज आहे.

Cloudy Weather
Rajma Crop : राजमा पीक का आहे फायदेशीर?

सोमवारी (ता. २७) दिवसभर ढगाळ वातावरण होते. मंगळवारीदेखील (ता. २८) ढगाळ वातावरण होते. यामुळे दिवसा उकाडा व रात्रीही उष्णता जाणवली. थंडी पुरती गायब झाली आहे.

यामुळे केळी, वेलवर्गीय व इतर भाजीपाला पिकांत बुरशीजन्य रोगांची समस्या येऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कलिंगडही काढणीवर आले आहे. पावसामुळे काढणी रखडून पुढे नुकसान होईल. आवक वाढेल व दरात घसरणीची भीतीही शेतकऱ्यांना आहे.

कांदा पिकात सिंचन केले जात आहे. परंतु पाऊस आल्यास त्यात मर रोग येऊन नुकसान होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी सिंचन तात्पुरते बंद केले आहे.

खरबूज पिकाचे सिंचनही बंद केले आहे. कारण उष्णता व पाऊस यात नुकसान होईल. लहान केळी पिकात शेतकरी प्रतिबंधात्मक फवारण्या घेत आहेत. यातून संभाव्य पीक हानी टाळण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com