Wheat Harvesting : पुणे जिल्ह्यात गहू काढणी सुरू

दौंड तालुक्यात सर्वाधिक सात हजार ५३५ हेक्टरवर पेरणी
Wheat Harvesting
Wheat HarvestingAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः रब्बी हंगामात (Rabbi season) शेतकऱ्यांनी पेरलेल्या गव्हाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मजुरांची समस्या असल्यामळे वाढीव मजुरी देऊन गव्हाची काढणी (Wheat Harvesting) शेतकऱ्याकडून केली जात आहे.

काही ठिकाणी काढणी केलेल्या गव्हाची मशिनच्या साह्याने मळणी व काढणीची कामे सुरू असल्याचे चित्र आहे.

यंदा रब्बीच्या हंगामात सरासरीच्या ३९ हजार ८०३ हेक्टरपैकी ४३ हजार ६३७ हेक्टर म्हणजेच सरासरी ११० टक्के पेरणी झाली होती.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा हे तालुके खरिपाची पिके घेणारे म्हणून ओळखले जातात.

रब्बी हंगामात या तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पेरणी झाल्याचे दिसून येते. पूर्वेकडील तालुक्यांमध्ये जुन्नर, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर हे तालुके आघाडीवर आहेत.

Wheat Harvesting
Wheat Harvesting : खानदेशात गहू पीक मळणीवर

जिल्ह्यात दौंड तालुक्यात सर्वाधिक सात हजार ५३५ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. त्यापाठोपाठ शिरूर, इंदापूर, दौंड, पुरंदर, जुन्नर या तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहे.

तर हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर, आंबेगाव तालुक्यांत कमी पेरण्या झाल्या आहेत. पावसाळ्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे रब्बी पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा होता.

त्यासाठी कृषी विभागाने सुरुवातीपासून खते, बियाण्यांचे नियोजन केले होते. रब्बीच्या पेरणीस ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा कालावधी चांगला असतो.

मात्र उशिराने झालेल्या पावसामुळे पुरेसा वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली होती.

सध्या पिके काढणीच्या अवस्थेत असल्याने काढणीच्या कामांना चांगलीच सुरुवात झाली आहे.

Wheat Harvesting
Grape Harvest : फळ काढणी, रिकटची तयारी

दृष्टिक्षेपात
पुणे जिल्ह्यात तालुकानिहाय झालेली गव्हाची पेरणी, हेक्टरमध्ये :
तालुका -- सरासरी क्षेत्र -- पेरणी झालेले क्षेत्र -- टक्केवारी
हवेली -- ८७० -- ९४८ -- १०९
मुळशी -- ३६९ -- १९३ -- ५२
भोर -- १९२७ -- १६४५ -- ८५
मावळ -- ५९१ -- ४०७ -- ४१
वेल्हे -- ३१८ -- १२९ -- ४१
जुन्नर -- ५६२६ -- ५६८५ -- १०१
खेड -- १५४८ -- १७०६ -- ११०
आंबेगाव -- १९४४ -- १३१८ -- ६८
शिरूर -- ४६७९ -- ६३२४ -- १३५
बारामती -- ६४४९ -- ७५२४ -- ११७
इंदापूर -- ४५२६ -- ५१५६ -- ११४
दौंड -- ५८२२ -- ७५३५ -- १२९
पुरंदर -- ५१३५ -- ५०६६ -- ९९
एकूण -- ३९,८०३ -- ४३,६३७ -- ११०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com